शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
4
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
5
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
6
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
7
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
8
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
9
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
10
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
11
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
12
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
13
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
14
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
15
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
16
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
17
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
18
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
19
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
20
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?

शहिदांचा सन्मान, पण ब्रह्मपुरीच्या अन्यायाविरोधात एल्गार

By admin | Updated: July 30, 2016 01:24 IST

शासनाने नवीन जिल्हे निर्मितीचे प्रस्ताव मागितले आहेत. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

निवेदन सादर : ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी ६ आॅगस्टला बंदचे आयोजन रवी रणदिवे ब्रह्मपुरी शासनाने नवीन जिल्हे निर्मितीचे प्रस्ताव मागितले आहेत. चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. शासनाच्या यादीत ब्रह्मपुरी व चिमूर या दोन ठिकाणांपैकी एकाला जिल्ह्याचे स्थान देण्याविषयी हालचाली सुरू आहेत. पण केवळ चिमूरची पार्श्वभूमी शहिदांची क्रांती भूमी पर्यंतच आहे. ब्रह्मपुरीकरांना शहिदांचा सन्मान आहे. पण ब्रह्मपुरीवर १९८२ पासून होणारा जिल्हा निर्मितीचा अन्याय यापुढे सहन केला जाणार नाही, असा एल्गार रूख्मिणी सभागृहात पार पडलेल्या सर्वपक्षीय, सामाजिक, सांस्कृतिक, व्यापारी व विद्यार्थी, महिला संघटनेने निर्धार करून हजारोच्या साक्षीने ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यापुढील रूपरेषा ठरविण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुभाष बजाज होते. शहिदांची भूमी म्हणून केवळ भावनिक आधारावर जिल्हा देणे हे नागरिकांच्या सोयीचे नाही. जिल्ह्याच्या स्थळाला जी चारही अंगाने पार्श्वभूमी पाहिली जाते, ती ब्रह्मपुरीला प्रदान झाली आहे. येथे सर्वांना सोयीचे होईल व आजुबाजूच्या कोणत्याही गावाला त्रास होणार नाही, असे भौगोलिक, दळणवळण व भौतिक सुविधा उपलब्ध असूनही १९८२ पासून ब्रह्मपुरीला वगळले जात आहे. हा खर तर शहीद स्व. गोपाळराव हर्षे, बालाजी मेश्राम व अन्य शहिदांचा अपमान आहे. तो अपमान यापुढे खपवून घेणार नाही व तिला प्राप्त केल्याशिवाय आता आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार या बैठकीच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी केला. या बैठकीनंतर जिल्हानिर्मितीचे हजारो समर्थक नारे व घोषणाबाजी करून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले. बैठकीमध्ये जिल्हानिर्मितीचा कार्यक्रम टप्पा ठरविण्यात आला. त्यानुसार ६ आॅगस्टला ब्रह्मपुरी बंद ठेवून मागणी रेटून धरण्याचा मानस निश्चित केला आहे. त्यानंतर क्रमाक्रमाने धरणे आंदोलन, उपोषण, रस्ता रोको यासारखे कार्यक्रम राबवून जिल्हा निर्मितीचे लक्ष प्राप्त करण्याविषयी ठरविले आहे. त्याचप्रमाणे जिल्हा निर्मितीचे पथक मुंबईला जाऊन मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांची भेट घेऊन मागणी करण्याचे ठरविण्यात आले आहे. जिल्हा निर्मितीचे आंदोलन उफाळण्याची शक्यता - ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी सर्वसारांचा समावेश केल्याने हे आंदोलन जनआंदोलन म्हणून उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राजकीय शक्तींची परीक्षा - या निमित्ताने आजी व माजी आमदारांचा राजकीय शक्तीची परीक्षा पाहण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे. मागणीला पाठबळ किती लावून येतात, ते या शक्तीवर अवलंबून आहे. नव्या दमाच्या कार्यकर्त्यांचा समावेश :- जिल्हा निर्मितीसाठी नव्या दमाच्या तरुणांना सोबत घेऊन जिल्ह्याची मागणी रेटून धरण्यात येणार असल्याने तरुणांत उत्साह संचारलेला दिसून येत होता. महिला वर्गाची उपस्थिती :- सभेत व निवेदन देताना महिला वर्ग उपस्थित असल्याने महिला वर्गाची उपस्थिती ही महत्वाची ठरणारी आहे. सर्वपक्षीय घटकांचा समावेश :- जेष्ठ नागरिक संघटना, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, विविध पक्षांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, महिला, डॉक्टर, प्राध्यापक व अन्य मंडळी बैठकीला उपस्थित होते.