शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाला भाव द्या, नाहीतर मरण...

By admin | Updated: November 12, 2016 00:51 IST

खरीप हंगामाच्या सुरूवातीलाच निसर्गाने दगा दिला. हाती पैसा शिल्लक नसताना उसनवारी व कर्ज काढुन कसेतरी शेती पिकविली.

शेतकरी काकुळतीला : हाक शासन दरबारी पोहोचणार काय ?प्रकाश काळे गोवरीखरीप हंगामाच्या सुरूवातीलाच निसर्गाने दगा दिला. हाती पैसा शिल्लक नसताना उसनवारी व कर्ज काढुन कसेतरी शेती पिकविली. मात्र उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. उत्पादनापेक्षा खर्च वाढला. त्या तुलनेत शेतमालाला योग्य दर मिळणे अपेक्षीत होते. मात्र तसे न करता कापूस आणि सोयाबिनची कवडीमोल भावात खरेदी सुरू झाली आहे. हा तोकडा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. त्यामुळे शेतमालाला योग्य भाव द्या, नाहीतर मरण... अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांत उमटत असून काकुळतीला आलेल्या शेतकऱ्यांची हाक शासनदरबारी पोहोचेल काय, हा प्रश्न आहे.शेतीला आज वाईट दिवस आले असून शेतकऱ्यांना कुणाचीही साथ उरली नाही. शेतीवर होणारा खर्च बघता शेतमालाला योग्य दर देणे अपेक्षीत आहे. मात्र तोकडा दर शेतकऱ्यांच्या माथी मारून कवडीमोल भावात कापूस व सोयाबीनची खरेदी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना घामाचे दाम मिळाले पाहिजे, तरच शेतकरी सुखी होईल. शेतकऱ्यांचा हा संघर्ष गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. परंतु, शेतकऱ्यांना त्यांचा हक्कच अजुनपर्यंत मिळालेला नाही. हा शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक केला गेलेला अन्याय आहे. शेतमालाला भाव नाही म्हणून अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी दिवाळीही साजरी केली नाही. दिव्यांच्या लखलखाटात सारा आसमंत उजळून निघाला असताना शेतकऱ्यांच्या घरी अंधार पसरला होता. गरजेपोटी शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस काढला आहे. परंतु, हा तोकडा दर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा आहे. शासनाने अजुनही कापसाचा दर घोषीत केला नाही. कवडीमोल भावात कापूस सोयाबिनची अक्षरश: लूट केली जात आहे. परंतु, शेतकऱ्यांचा नाईलाज झाला असून याचा पुरेपूर फायदा खासगी व्यापारी घेत आहे.कापसाची ५ रुपये किलोप्रमाणे वेचणी सुरू आहे. दोन हजार रुपये बॅग प्रमाणे शेतकऱ्यांनी सोयाबिनची कापणी केली. परंतु, १ हजार ८०० पासून दोन हजार ७०० पर्यंत सोयाबिन खरेदी करणे सुरू आहे. त्यामुळे निराश होऊन शेतकरी वर्ग आयुष्यच संपवायला निघाला आहे. परंतु, याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. शेतकऱ्यांचा माल विकल्यावर जर दरवाढ करण्यात येत असेल तर तो जाणीवपूर्वक केला गेलेला अन्याय आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे शेतकरी पुरता काकुळतीला आला आहे. शेतमालाला भाव द्या, नाहीतर मरण... ही शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांना अच्छे दिन आणू म्हणणाऱ्या मोदी सरकारचे वाभाडे काढणारी आहे. त्यामुळे सरकारने शेतमालाला योग्य भाव देणे अपेक्षीत आहे.शेतकऱ्यांचे राजकीय पुढारी गेले कुठे?शेतकरी आज पूर्णत: देशोधडीला लागला आहे. शेतमालाला योग्य भाव नाही तरीही शेतकऱ्यांना गरजेपोटी कवडीमोल भावात आपला माल विकावा लागत आहे. निवडणूक काळात ‘हम तुम्हारे साथ है’ म्हणत शेतकऱ्यांच्या काळजातून बोलणारे राजकीय नेते आज गेले कुठे? शेतकऱ्यांच्या पाठीशी कोणताही राजकीय नेता नाही, ही शोकांतिका आहे.शेतकऱ्यांना हवे घामाचे दामदिवस-रात्र ऊन-वारा, पाऊस थंडीची तमा न बाळगता शेतकरी वर्ग शेतात राबतो. मात्र त्याने पिकविलेल्या हक्काच्या चतकोर भाकरीलाही तो पोरका झाला आहे. शेतकऱ्यांना आता हक्काचे घामाचे दाम मिळाले पाहिजे, यासाठी सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे.