चंद्रपूर जिल्ह्यासह सिंदेवाही तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तालुक्यात ३०० कोरोना रुग्ण आहेत. तालुक्यातील रुग्णांसाठी सिंदेवाही येथे प्रशासनाने कोविड केअर सेंटर उभारले आहे. या केंद्रात १०५ रुग्ण आहेत. या रुग्णांवर आरोग्य विभागातर्फे उपचार करण्यात येत आहेत. मंगळवारी तालुक्यातील ५४ वर्षीय रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला या केंद्रात दाखल करण्यात आले. त्याच्यावर केंद्रामध्ये उपचार सुरू होता. परंतु, बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या रुग्णांवर अंतिम संस्कार करण्याचा प्रश्न निर्माण झाला. नगर पंचायतच्या कोरोना योद्ध्यांनी यावर अंत्यसंस्कार करण्यास मनाई केली. मात्र मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड यांनी त्यांची समजूत घालून सुरक्षितता बाळगत अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याचे मन वळविले. त्यानंतर कोरोना योद्धांनी तयारी दर्शवित पीपीई कीट घालून सुरक्षितता बाळगत त्या पार्थिवाचे विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सिंदेवाही न.पं च्या कोरोना योद्ध्यांकडून कोरोना मृतकावर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:29 IST