लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्लायफोसेट तणनाशकाचा अनावश्यक वापर वाढल्यामुळे जैवविविधतेस बाधा येत असुन जमीन व मानवी आरोग्यास धोका निर्माण झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी आरबीटी, चोरबीटी कापूस बियाणे खरेदी करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले आहे.शेतीमध्ये सततचा तणनाशकाचा वापर होत असल्याने कालांतराने त्या शेतीमध्ये कोणतेही पीक उगवणार नाही अशी शक्यता आहे. चोर बीटीमध्ये गुलाबी बोंड अळीला प्रतिकार करणाऱ्या जीनची उपलब्धता आवश्यक असलेल्या विहीत टक्केवारीपेक्षा कमी असल्यामुळे हे वाण गुलाबी बोंड अळीस हमखास बळी पडते व त्याचा दुष्परिणाम कापूस पिकावर होतो. बियाण्याची विक्री, साठवणूक अथवा खरेदी करण्यात येऊ नये याकरिता कृषी विभाग व पोलीस विभागाच्या संयुक्तपणे शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे. शेतकऱ्यांनी बियाण्याची पेरणी त्यांच्या शेतावर केल्यास व पेरणी पश्चात कोणत्याही प्रकारची तक्रार केल्यास दखल घेण्यात येणार नाही, असेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. पाटील यांनी स्पष्ट दिले. कोविड-१९ या संसर्गजन्य आजारापासून संरक्षण करण्यासाठी शेतात काम करताना ३ ते ५ फूट अंतर ठेवावे. हात वारंवार साबणाने धुवावे, शक्यतो सॅनिटायझरही वापरावा, असे आवाहन कृषी विभागाने केले.चोर बीटीचे दुष्परिणामजिल्ह्यात चोर बीटी या नावाने परिचित व शासन मान्यता नसलेल्या अनधिकृत कापूस बियाण्याचा व्यवसाय काही खासगी व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती कृषी विभाग व प्रशासनाला प्राप्त होत आहे. हे बियाणे ग्लॉयफोसेट या तणनाशकाला प्रतिकारक्षम असल्यामुळे शेतकरी याकडे आकर्षित होतात. परंतु, त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम आढळून आल्यामुळे शासनाने या बियाण्यास मान्यता दिली नाही.अन्यथा पाच वर्षाची शिक्षाबियाणे उत्पादनास अधिकृत मान्यता नसल्याने सदरील बियाणे पुर्णपणे अनधिकृत रित्या उत्पादीत केले असुन सदर बियाणे बाळगणे, साठा करणे, विक्री करणे हे कापूस बियाणे अधिनियम २००९, बियाणे नियम १९६६ व पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या तरतुदीनुसार कायदेशीर कारवाईस पात्र आहे. यामध्ये पाच वर्षांची शिक्षा व एक लाख दंडाची तरतूद आहे.
शेतकऱ्यांनो, आरबीटी, चोरबीटी कापूस बियाणे खरेदी करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST
शेतीमध्ये सततचा तणनाशकाचा वापर होत असल्याने कालांतराने त्या शेतीमध्ये कोणतेही पीक उगवणार नाही अशी शक्यता आहे. चोर बीटीमध्ये गुलाबी बोंड अळीला प्रतिकार करणाºया जीनची उपलब्धता आवश्यक असलेल्या विहीत टक्केवारीपेक्षा कमी असल्यामुळे हे वाण गुलाबी बोंड अळीस हमखास बळी पडते व त्याचा दुष्परिणाम कापूस पिकावर होतो.
शेतकऱ्यांनो, आरबीटी, चोरबीटी कापूस बियाणे खरेदी करू नका
ठळक मुद्देकृषी विभागाचे आवाहन। कोरोनाच्या दहशतीतही जिल्ह्यात छुपी विक्री