शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

सामाजिक परिवर्तन करणारा किमयागार शिक्षक

By admin | Updated: September 5, 2016 00:57 IST

शिक्षक हा ज्याप्रमाणे शिक्षण प्रक्रियेतील कर्णधार असतो; त्याचप्रमाणे तो सामाजिक परिवर्तन करणारा किमयागारही असतो.

भूृमिका महत्त्वाची : सरकारने विचार करण्याची गरजमंगल जीवने बल्लारपूरशिक्षक हा ज्याप्रमाणे शिक्षण प्रक्रियेतील कर्णधार असतो; त्याचप्रमाणे तो सामाजिक परिवर्तन करणारा किमयागारही असतो. म्हणून भारताला महासत्ता बनायचे असेल तर, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहणार आहे. गुरुपरंपरेचा थोर वारसा प्राचीन काळापासूनच देशाला लाभला आहे. समाजसुधारकांनी शिक्षणाचे महत्त्व समाजातील सर्वच स्तरापर्यंत पोहोचविण्याचा अथक प्रयत्न केला. त्यामध्ये महात्मा ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य या पार्श्वभूमीवर अद्वितीय स्वरुपाचे ठरले. आपल्या प्रकांड बुद्धिमत्तेचा ठसा परदेशातील शिक्षण संस्थावर उमटवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शैक्षणिक विद्वत्तेमुळे आधूनिक भारताचे घटनाकार बनले. म्हणून शिक्षण व शिक्षकाचे महत्त्व वाढत चालले आहे. शिक्षक दिन हा तसा शिक्षकांचे कौतुक करण्याचा मानसन्मानाचा दिवस म्हणूनच अलीकडच्या काळात ओळखला जातो. कोवळ्या वयातील विद्यार्थ्यांपासून तर महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणांनाही प्रभावीत करण्याचे कौशल्य शिक्षकांमध्ये असते. सर्वच वयोगटातील मुलांना सुयोग्य आकार देण्यासाठी तो सातत्याने धडपडतो. बरेच विद्यार्थी एकवेळ आपल्या पालकांचे ऐकत नाहीत; पण आपल्या शिक्षकांचे ऐकतात. ऐवढा विश्वास शिक्षकी पेशात असतो. एवढे असूनही शिक्षकांच्या प्रश्नावर सातत्याने चालढकल करण्याची मानसिकता असणारे प्रशासन या शिक्षकदिनी शिक्षकांना आवडेल, अशी एखादी घोषणा करण्याची संधी देखील साधत असते. मात्र शिक्षक दिवस संपला की, शिक्षक स्नेही माहोल वर्षभर दिसून येत नाही. कारण टीचर्स एक्सलन्सी सेंटरच्या माहितीनुसार कार्यरत शिक्षकांपैकी ७३.३ टक्के शिक्षक दबावाखाली काम करीत असल्याचा विषय राष्ट्रात चिंतेचा बनला आहे. जर असे असेल तर त्यांच्याकडून सर्वोकृष्ठ कामगिरीची अपेक्षा ठेवायची का? असा प्रश्न पडतो आहे. दबावरहित वातावरणातून शिक्षक मुक्त झाला तर विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना अधिक विकसीत करण्याची संधी यानिमीत्याने शिक्षकांना मिळेल व शिक्षक दिनी असणारे शिक्षकस्नेही वातावरण सदैव राहण्यासाठी विचार करणे आवश्यक आहे.