परिमल डोहणे चंद्रपूर२०१५-२०१६ हे शैक्षणिक वर्ष संपून नवे शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. मात्र बहुतेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज समाजकल्याण कार्यालयात जमा केले नसल्याने अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. शिष्यवृत्ती अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांपैकी जिल्ह्यातील ७ हजार १५८ विद्यार्थ्यांचे अर्ज अजूनही महाविद्यालयातच पडून आहेत. २०१५-२०१६ या शैक्षणिक सत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील ५९ हजार २९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज दाखल केले होते. त्या अर्जांच्या पडताळणीनंतर ४९ हजार १४१ अर्ज वैध ठरविण्यात आले. तर ६५० अर्ज नाकारण्यात आले. त्यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ७ हजार १५८ अर्ज महाविद्यालस्तरावर प्रलंबित आहेत. महाविद्यालयांना अनेकदा सूचना देऊनही महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती अर्ज समाजकल्याण कार्यालयात जमा केले नाहीत. त्यामुळे शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले नाही. परिणामी विद्यार्थ्यी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात ७९ कनिष्ठ महाविद्यालये, ८० वरिष्ठ महाविद्यालये, ३१ औद्योगीक प्रक्षिण संस्था, १२८ व्यावसायिक महाविद्यालये व ७४ इतर महाविद्यालये असे एकूण ३९२ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरुन अर्जाची प्रत महाविद्यालयात जमा केली. समाजकल्याण विभागाने ३१ मार्चच्या आत शिष्यवृत्ती अर्ज समाजकल्याण कार्यालयात जमा करण्याची सूचना महाविद्यालयांना केली होती. मात्र महाविद्यालयांनी त्याकडे दुर्लक्ष करीत शैक्षणिक वर्ष संपून नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले. तरीही शिष्यवृत्ती अर्ज समाजकल्याण कार्यालयात जमा केले नाहीत. यामध्ये ओ.बी.सी विद्यार्थ्याचे ३ हजार ३०५ अर्ज, एस.बी.सी. विद्यार्थ्यांचे २१४ अर्ज, एसी.सी. विद्यार्थ्यांचे २ हजार ६०९, एन.टी. विद्यार्थ्यांचे १ हजार ३० अर्ज अजूनही महाविद्यालयातच आहेत. विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेतमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरुन महाविद्यालयात जमा केले. मात्र बहुतेक महाविद्यालयांनी शिष्यवृत्ती अर्ज समाजकल्याण कार्यालयात जमा केले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती मिळाली नाही. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज समाजकल्याण कार्यालयात जमा झाले. त्यातील बहुतेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली तर काही विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत.