शेतकरी संकटात : आर्थिक विंंवचना धोक्याचीगुंजेवाही : यावर्र्षीे पाऊस चांगल्या प्रमाणात पडला नसल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात दुबार पेरणी करुन मोठ्या आशेने शेतामध्ये पिकाची लागवड केली. तर काही शेतकऱ्यांनी लागवड सुद्धा केली नाही. मात्र पाण्याअभावी आशेचा पूर्ण आधार न सापडल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक विंवचनेत सापडला आहे. यापूर्वी सुरुवातीपासूनच पावसाने दगा दिला. त्यामुळे अनेकांची रोवणी होवू शकली नाही. मात्र ज्या शेतकऱ्यांनी रोवणी केली त्या आज ना उद्या पाऊस येईल व तलाव भरेल या आशेने पिकाची लागवड केली. त्या शेतकऱ्यांचे शेतातील पीके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यात पून्हा विविध रोगांची भर पडली आहे. अगोदरच कर्जाच्या खाईत पडलेला शेतकरी सुद्धा शेतीवर औषधी फवारीत आहे. परंतु महागडे औषधी फवारुनही रोग नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत पडला आहे तर धानाचे भाव कमी असल्याने उरल्या सुरल्या आशा मावडत आहेत.कमी भावामुळे लागवड खर्चही भरून निघत नाही. व्यापारी शेतकऱ्यांची थट्टा चालवित आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीवर जो तो लाथा मारीत सुटलेला आहे. शेतात राब राब राबणाऱ्या शेतकऱ्यांचा कोणीही वाली नाही. शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. शेतातील मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना द्याव, ठोकळ धानाचा भाव कमीत कमी १७०० रुपये व बारीक धानाचा भाव कमीत कमी २७०० रुपये या भावाने विक्री व्हावी अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. किटकनाशके व खते यांची किंमत कमी करुन शेतकऱ्यांपर्यंत पुरविण्यात मदत करावी, तरच शेतकरी सुखी होईल नाही, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. (वार्ताहर)
धान पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव
By admin | Updated: September 18, 2015 01:02 IST