शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

भाव मिळत नसल्याने दुग्ध व्यवसाय डबघाईस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 23:15 IST

तालुक्यातील नांदाफाटा, बिबी, गडचांदूर, बाखर्डी, वनसडी, लखमापूर, कोरपना व अशा अनेक गावातील शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दूध उत्पादन सुरू केले आहे. मात्र दुधाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली असून दुग्ध व्यवसाय डबघाईला आला आहे.

ठळक मुद्देपायाभूत सुविधांचा अभाव : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

आशिष देरकर ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : तालुक्यातील नांदाफाटा, बिबी, गडचांदूर, बाखर्डी, वनसडी, लखमापूर, कोरपना व अशा अनेक गावातील शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दूध उत्पादन सुरू केले आहे. मात्र दुधाला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली असून दुग्ध व्यवसाय डबघाईला आला आहे.मदर डेअरीच्या माध्यमातून नांदाफाटा, गडचांदूर व कोरपना येथे दूध संकलन केंद्र उभारण्यात आले. संकलन केंद्रामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. किरकोळ पद्धतीने दूध विकण्यापेक्षा एकाच ठिकाणी संकलन केंद्रावर विक्री होत असल्यामुळे शेतकºयांचा त्रास कमी झाला. मात्र दूध संकलन केंद्रावर कवडीमोल भावात दुधाची खरेदी करीत असल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. बºयाच शेतकºयांनी लाखो रुपये खर्च करून हरियाणा, राजस्थान, गुजरात व अन्य राज्यांमधून गाई व म्हशींची खरेदी केली.दुधाला भाव नसल्याने हा व्यवसाय डबघाईला आला आहे. विशेष म्हणजे, शेतामध्ये जनावरांसाठी चारा लावणे, दूध वाढण्यासाठी पोषक ठरणारे खाद्य खरेदी करणे, मजुरांना लागणारा खर्च, जनावरांसाठी शेड, पाण्याची व्यवस्था, विजेची व्यवस्था, दूध काढणी यंत्र खरेदीसाठी गुंतवणूक करावी लागली. त्यामुळे शेतकरी हा व्यवसाय बंद करू शकत नाही. मिळेल त्या किमतीमध्ये दूध विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.शासनाने घ्यावी दखलशेतकऱ्यांनी पर्यायी व्यवसाय करावा किंवा जोडधंदा करावा, यासाठी शासनाकडून प्रोत्साहन देण्याची घोषणा केली जाते. पण ज्या शेतकऱ्यांनी धोका पत्करून जोड व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला त्यांना पायाभूत सुविधा पुरवित नाही. शेतकऱ्यांना पाठबळ मिळाल्यास शेतकरी दुग्ध व्यवसाय उत्तम पद्धतीने करू शकतात. यातून त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल. शासनाने तालुक्यातील दूध उत्पादकांच्या समस्या निकाली काढून दुधाला अधिकाधिक भाव देण्याची मागणी केली जात आहे.वैयक्तिक विक्री जास्त किमतीततालुक्यातील बरेच शेतकरी मदर डेअरीऐवजी वैयक्तिकरित्या घरोघरी फिरून दुधाची विक्री करतात. त्या ठिकाणी शेतकºयांना म्हशीच्या दुधाला ६० ते ७० रुपये प्रति लिटर तर गाईच्या दुधाला ४० ते ५० रुपयापर्यंत प्रति लिटर दर मिळतो. तेच दूध मदर डेअरीमध्ये विक्रीकरिता नेल्यास कमीत कमी किंमत २३ रुपये मिळतात. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडते.खाद्याच्या किंमती वधारल्यादूध उत्पादक शेतकऱ्यांना जनावरांच्या खाद्यावर विशेष लक्ष ठेवावे लागते. मात्र हे खाद्य महाग आहे. यामध्ये जनावरांना लागणारी ढेप २ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल, मका चुरी १६०० रुपये व तुरीची चुरी १७०० रुपये क्विंटल दराने विकत घ्यावे लागते.