सास्ती : राजुरा तालुक्यातील धिडशी ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांचा सत्कार शेतकरी संघटनेचे नेते, माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कवडू पोटे, शेतकरी संघटना तालुका प्रमुख शेषराव बोंडे, युवा आघाडी प्रमुख कपिल इद्दे, नगरसेवक मधुकर चिंचोळकर, माजी सरपंच व बाजार समितीचे उपसभापती दत्तू ढोके, गुरुदेव सेवा मंडळाचे अमरनाथ जीवतोडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात रिता बंडू हनुमंते, उपसरपंच राहुल सपाट, ग्रामपंचायत सदस्य विनोद कोरडे, बंडू काकडे, माया जीवतोडे, गीता ढोके, सिंधुताई निखाडे या सात नवनिर्वाचितांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
ग्रामपंचायत भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला डॉ. नानाजी काकडे, उद्धव सपाट, राजू वऱ्हाटे, महादेव काकडे, भाऊराव जीवतोडे, बंडू हनुमंते उपस्थित होते.