शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

जिल्ह्यात उद्योगांचे राक्षसी प्रदूषण

By admin | Updated: June 6, 2017 00:29 IST

प्रदूषणाच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा देशात कुप्रसिध्द झाला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

तब्बल सातशे उद्योग  ओकताहेत धूर जीवघेण्या प्रदूषणाने घेतला अनेकांचा बळी दीडशे उद्योग   डेंजर झोनमध्येरवी जवळे । लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रदूषणाच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा देशात कुप्रसिध्द झाला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी प्रदूषणामुळे जिल्ह्यातील नागरिकांचे हकनाक बळी जात आहे. जिल्ह्यातील हे जीवघेणे प्रदूषण शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्यासाठी नवे नाही. सर्वच प्रदूषणाची भयावह स्थिती जाणून आहेत. मात्र ते नियंत्रणात आणणारी एकही प्रभावी उपाययोजना शासन-प्रशासनाला अद्याप गवसली नाही. आजही जिल्ह्यातील तब्बल सातशे उद्योग प्रदूषण ओकताहेत. यातील १५० उद्योग तर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नजरेत सर्वाधिक प्रदूषण करणारे आहेत. चंद्रपूर शहर हे ऐतिहासिक शहर आहे. प्राचिन इतिहासाच्या खुणा आजही या भूमीत दिमाखाने उभ्या आहेत. गोंडराजाच्या राजवटीत या शहराची उभारणी झाली. शहरातून वाहनाऱ्या इरई आणि झरपट या नद्यांमुळे चंद्रपूर आणखी सुंदर आणि संपन्नतेने नटले. कालांतराने या भूमीत विपुल खनिज संपत्ती असल्याचे आढळून आले आणि तिथूनच उद्योगांचा पसारा वाढत गेला. चंद्रपूर शहराला लागून व जिल्ह्यातील राजुरा, घुग्घुस, दुर्गापूर, भद्रावती, वरोरा या परिसरातील जमिनीत कोळसा असल्याचे आढळून आल्याने या ठिकाणी कोळसा उद्योग उभे झालेत. कोळसा मुबलक असल्याने पॉवर प्लांटसारख्या उद्योगांनाही चालना मिळाली. चंद्रपुरातील ऊर्जानगर परिसरात चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र उभारण्यात आले. आज हे केंद्र आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे वीज केंद्र असून यातून २९२० मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. या उद्योगापाठोपाठच स्टिल प्लांट, पेपर मील, विविध सिमेंट कंपन्या, आयुध निर्माणी कारखाना या मोठ्या उद्योगांसह शेकडो लहानमोठे उद्योग जिल्ह्यात आज उभे ठाकले आहेत. उल्लेखनीय असे की उद्योगांनी सामाजिक स्थिती व आरोग्य यांना बाधा पोहचू नये, यासाठी अनेक नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. उद्योगांमधून प्रदूषण होणार नाही, याची खबरदारी घेणेही आवश्यक आहे. मात्र दोन्ही हाताने पैसे कमावण्याच्या नादात जिल्ह्यातील उद्योगांनी अनेक नियम पायदळी तुडविले. याचा परिपाक असा झाला की एकेकाळी विपुल वनसंपदेने नटलेल्या या जिल्ह्यातील प्राणवायूच आता नागरिकांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे. जिल्ह्यातील प्रदूषण मागील काही वर्षात एवढ्या झपाट्याने वाढत गेले की चंद्रपूर देशातील चवथ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर ठरले. आज हे प्रदूषण नागरिकांचा बळी घेऊ लागले आहे. जिल्ह्यातील तब्बल सातशे उद्योग प्रदूषण ओकत आहेत. यातील १५० उद्योग तर प्रदूषणाचे राक्षसच ठरले आहे. तरीही शासकीय यंत्रणेत आनंदी आनंदच आहे.क्रांती उद्योगांची की आजारांची ?चंद्रपूर जिल्ह्यात औद्योगिक क्रांती झाली, असे सर्वत्र बोलले जाते. मात्र याच उद्योगांमुळे आज विविध आजारांनीही क्रांती केल्याचे दिसून येते. एकापाठोपाठ एक अस्तित्वात आलेल्या उद्योगांमुळे अनेकांना रोजगार मिळाला. एवढ्यापुरते समाधान जिल्हावासीयांना लाभले. त्यानंतर याच उद्योगांनी नागरिकांच्या आरोग्याची, पर्यायाने आयुष्याचीच माती केली. दमा, अस्थमा, कर्करोग, ह्दयरोग यासारखे दुर्धर आजार नागरिकांच्या माथी मारले. उद्योगातील प्रदूषणावर आळा बसविणारे महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय चंद्रपुरात आहे. मात्र हे कार्यालय आणि तेथील यंत्रणा पांढरा हत्ती ठरले आहे. नोटीस बजावणे, दंडात्मक कारवाई करण्यापलिकडे मंडळाने फारसे काही केले आहेअनेकांचा मृत्यूजिल्ह्यात प्रदूषण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये विविध आजाराचे लक्षण दिसत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आकडेवारीनुसार दमा, ह्दयविकार, अ‍ॅसीडीटी, त्वचा रोग, टीबी यासारख्या आजारांमुळे आतापर्यंत शेकडो लोकांचा बळी गेला आहे. याच प्रदूषणामुळे अनेकजण आजही मृत्यूशी झुंज देत असून लाखो रुपये त्यांच्यावरील उपचारात खर्च होत आहे.जलप्रदूषणही गंभीरजिल्ह्यातून वर्धा, इरई, उमा, झरपट, पैनगंगा या नद्या वाहतात. मात्र वेकोलिच्या कोळसा खाणी, रासायन तयार करणारे कारखाने, पेपर मील, महाऔष्णिक वीज केंद्र व सिमेंट कंपन्यांमुळे यातील इरई आणि वर्धा नदीही प्रदूषित झाली आहे. झरपट नदीचे तर अस्तित्वच संपावे, अशी तिची अवस्था झाली आहे. कारखान्यातून निघणारे रसायनयुक्त पाण्यामुळे जलस्रोत प्रदूषित होऊन जलप्रदूषणाचा धोका वाढला आहे.असे आहेत प्रदूषित उद्योगांचे आकडेजिल्ह्यात एकूण ७५० उद्योग आहेत. यात ५० उद्योग मोठे, १० मध्यम तर उर्वरित उद्योग लहान आहेत. यातील १५० उद्योग अतिशय प्रदूषणकारी असल्याने त्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने रेड कॅटेगरीत टाकले आहे. २०० उद्योग थोडे कमी प्रदूषण करणारे म्हणजेच आॅरेंज कॅटेगरी, ३५० उद्योग ग्रिन कॅटेगरी आणि ५० उद्योगातून फारच कमी प्रदूषण होत आहे.