शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चारा, पाण्याअभावी दूध उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:36 IST

समाधानकारक पाऊस न पडल्याने पाणी व चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली. परिणामी, दुधाचे उत्पादन घटले असून शासकीय दुग्ध शाळेत केवळ पाच हजार लिटर दुधाचे संकलन करून तेवढेच वितरण करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. तर दुसरीकडे ग्राहकांकडून मागणी असूनही पुरेसे दूध मिळत नसल्याने आधीच हतबल झालेल्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देपशुधनपालक शेतकरी संकटात : दुग्धशाळेत दररोज केवळ पाच हजार लिटर दूध संकलन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : समाधानकारक पाऊस न पडल्याने पाणी व चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली. परिणामी, दुधाचे उत्पादन घटले असून शासकीय दुग्ध शाळेत केवळ पाच हजार लिटर दुधाचे संकलन करून तेवढेच वितरण करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. तर दुसरीकडे ग्राहकांकडून मागणी असूनही पुरेसे दूध मिळत नसल्याने आधीच हतबल झालेल्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.विदर्भातून सर्वाधिक कमी दुध उत्पादन करणारा जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. सिंचनाचे क्षेत्र समाधानकारक नसल्याने हजारो शेतकरी केवळ भातशेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पारंपरिक भातशेतीमधून पुरेसे उत्पन्न मिळत नाही. पण, नाईलाजास्तव शेतकºयांना दिवस ढकलण्याशिवाय दूसरा पर्यायच नाही. शेतीला पूरक व्यवसाय करण्याच्या केवळ घोषणा झाल्या. मात्र, लोकप्रतिनिधींनी यादृष्टीने परिणामकारक प्रयत्न केले नाही. त्यामुळे हजारो शेतकरी पारंपरिक शेतीच्या दुष्टचक्रात अडकले आहेत. लागवडीचा खर्चही मिळत नाही. सिंचनाची व्याप्ती वाढविण्यासाठी उपलब्ध असणारे जलस्त्रोत व त्यावर आधारीत कृषीपूरक दुग्ध उत्पादनाच्या योजना जिल्ह्यात आल्या असत्या तर शेतकºयांची दैनावस्था संपली असती. पण, सरकारच्या उदासिन धोरणामुळे चंद्रपूर जिल्हा दूध उत्पादनात मागे पडला आहे.चार जिल्ह्यांतून दुधाची आयातशेतीसोबत दुधाळी जनावरांचे पालन करून उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकरी पुढे येत आहेत. मात्र, जिल्ह्यात मोठी योजना न आल्याने मागणीच्या तुलनेत पुरेसे दुग्ध उत्पादन होत नाही. भंडारा, गोंदिया, वर्धा व नागपूर जिल्ह्यातून दूधाची आयात करून जिल्ह्याची गरज पूर्ण करावी लागत आहे.आश्वासने कागदावरचशासकीय दुग्धशाळेत अद्ययावत संयंत्र सोयीसुविधा आहेत. पण, दुग्धोत्पादन क्षमतेपेक्षा कमी आहे. ते पुन्हा वाढू शकते. उपलब्ध संसाधनांचा वापर करून दुग्ध प्रक्रीया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्याचे आश्वासन राज्याचे दूग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिले होते. परंतु तेही कागदावरच राहिले आहे.संस्थात्मक केंद्रांची उपेक्षाचंद्रपुरातील दूध डेअरीमध्ये नागभीड व उमरेड येथील शित केंद्रातून दूध आणले जाते. सद्यस्थितीत तीन संकलन केंद्रे बंद आहेत. खासगी दूध कंपन्यांपेक्षा जनतेचा शासकीय दूध खरेदीवर विश्वास आहे. केंद्रातील दुधाची गुणवत्ता उत्तम असली तरी उत्पादन व संकलनासाठी सरकारने गांभीर्याने लक्ष दिले नाही. संबंधित यंत्रणा कार्य करते. पण, आर्थिक बळ नाही. संस्थांत्मक केंद्रांची उच्च पातळीवरूनच उपेक्षा केली जात जात आहे. याकरिता संकलन व खरेदी थेट शितकरण संयंत्रातून सोसायटी, जिल्हा संस्था अथवा वैयक्तिक दूध उत्पादकांकडून घेण्यासाठी परवानगी देण्याचा विचारही गुंडाळून ठेवण्यात आला. सरकारकडून दूग्ध उत्पादनासाठी विशेष प्रयत्न होत नसल्याची नाराजी शेतकºयांनी व्यक्त केली आहे.