सावली : यंदा तुरळक पाऊस झाल्याने धान पिकाचे उत्पादन पुरेसे होऊ शकले नाही. परिणामी शेतकरी संकटात सापडला असून जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. धान उत्पादनावरच वर्षभराचे शेतकऱ्यांचे कुटुंबाच आर्थिक नियोजन होत असते. मात्र धान पीक न झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आधार मिळावा म्हणून सावली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा अशी मागणी मेहाबुजच्या सरपंच उषा राजेंद्र भोयर यांनी प्रशासनाकडे केली आहे.सावली तालुका हा धान पिकाचा पट्टा समजला जातो. तशी ओळखही जिल्ह्यात आहे. या परिसरामध्ये पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. परिसरात सिंचनाची सोय नसल्याने या पिका व्यतिरिक्त दुसरे पिक घेता येत नाही. खरीप हंगामातच धान पीक घ्यावे लागते. या कालावधीमध्ये पावसाच्या सरी बरसत असतात. त्यामुळे तलाव, बोडी, सारख्या माध्यमातून पाण्यासाची साठणून ठेवून ते पुढे पीक निघेपर्यंत उपयोग करावा लागतो. या कालावधीमध्ये शेती काम मजुरांना रोजगार उपलब्ध होतो. तसेच अनेक कुटुंबाना शेती नसल्याने त्यांनाही रोजगाराचे दुसरे साधन नाही. त्यामुळे कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी आर्थिक पाठबळ शेतीच्या माध्यमातून मिळत असते.ग्रामीण भागात व अतिदुर्गम भागात शेती हा जीवन जगण्याचा मुख्य आधार आहे. शेतीच्या माध्यमातून वर्षभराचा रोजगार उपलब्ध होतो. तसेच या पसिरामध्ये हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मजुरी केल्याशिवाय चूल पेटत नाही. हे वास्तव्य चित्र या भागातील आहे. अशी विचित्र परिस्थिती असताना तलाठ्यांनी धान शेतीचा नजर अंदाज सर्वे करुन ६१ पैसे आणेवारी दाखविली. हे कर्मचारी धान शेतीवर प्रत्यक्ष जात नाही. घरी बसूनच त्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात पेरणीपेक्षा ५० टक्केपेक्षा कमी पीक होत आहे. या परिसरात पाऊस किती झाला याची टक्केवारी कर्मचाऱ्याकडे आहे. (तालुका प्रतिनिधी)
सावली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा
By admin | Updated: November 13, 2015 01:12 IST