लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नगदी पीक म्हणून जिल्ह्यातील शेतकरी कपाशीची लागवड करीत होते. मात्र दिवसेंदिवस ही शेती तोट्याची ठरत असल्याने आता शेतकरी पर्यायी पिकांच्या शोधात आहे. विशेष म्हणजे, काही वर्षांपासून कापसाला सोयाबीन हे पर्यायी पीक होते. मात्र यावर्षी अवकाळी पावसामुळे होत्याचे नव्हते झाले आणि कापूस, सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आता करायचे तरी काय, असा प्रश्न कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.मागील काही वर्षांमध्ये कपाशीच्या लागवड खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच यावर्षी कापसाच्या पिकावर विविध रोगांचा प्रादूर्भाव झाला. परतीच्या पावसामुळे कापसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळेनासे झाले आहे. परिणामी यावर्र्षी कापसाची शेती तोट्याची ठरत आहे.खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, कापूस पिकाला सततच्या पावसाचा फटका बसला. शेतीला यावर्षी मोठा खर्च लागला असून पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लावलेला खर्च वसूल होण्याची शक्यता नाही. कापसाची बोंडे सततच्या पावसामुळे काळवंडली आहेत. यामुळे चांगल्या दर्जाचा कापूस येण्याची शास्वती नाही. झाडांवर लागणाºया फुले, पाल्यांची गळतीही होत आहे. सद्या कपाशी पीक पिवळे पडून पाने लाल होत आहेत. कीड रोगांपासून बचावासाठी शेतकºयांनी कपाशीवर पिकावर वेळोवेळी महागडी फवारणी केली. शेती मशागत, खते, फवारणी आणि वेचणीसाठी हजारो रुपये खर्च करण्यात आला. कापसाला योग्य भाव नसल्याने लावलेला खर्चही निघणे यावर्षी कठीण झाले आहे.जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती राजुरा, कोरपना या तालुक्यासोबतच चंद्रपूर तालुक्यातील काही भागातील शेतकरी कापसाची लागवड करतात. विशेष म्हणजे, मागील दोन ते तीन वर्षांपासून पोंभूर्णा, गोंडपिपरी या धान उत्पादक तालुक्यातील शेतकºयांनीही कापसाची लागवड सुरु केली आहे. मात्र त्यांना अद्यापही या पिकामध्ये पाहिजे तसे यश आले नाही. यावर्षी मात्र सर्व शेतकºयांची अवकाळी पावसाने दैना केली आहे. त्यातच कापूस उत्पादकांचे मोठे नुकसान झाल्याने मजूरी करू, पण कापसाची शेती करायची नाही, असा विचार काही शेतकरी करीत आहेत.उत्पादनापेक्षा खर्च अधिकउत्पन्नापेक्षा खर्चच अधिक होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकºयांना शेती व्यवसाय करण्यासाठी शासनाने विविध योजनांचा लाभ करून द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. जिल्ह्यात सोयाबीनची कामे पूर्ण झाली असून गहू आणि हरभरा पेरणीची कामे सुरू आहे. त्यातच कापूस निघण्याचे दिवस सुरू आहे. मात्र मजुरांची मजुरी दिवसेंदिवस वाढता असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. सोयाबीन पिकविण्याकरिता शेतकºयाला एका एकराला आठ ते दहा हजार रुपये खर्च येतो. उत्पादनाकरिता जेवढा खर्च होतो, तेवढ्या खर्चाचे पीक सुद्धा येत नाही. पाऊस शेतीपूरक पडला तर ठिक अन्यथा शेतकºयाला तोट्यात जावे लागते. त्यामुळे शेती करायचे कुणी धाडस करीत नाही. जिल्ह्यात बºयाच ठिकाणी महागाईमुळे काही शेतमालकाची शेती ओसाड पडली आहे.मशागतीपासून कापूस वेचणीपर्यंत सारखा खर्च करावा लागतो. त्यातच योग्य भाग नसल्याने कपाशीची शेती करणे परवडत नाही. मात्र दुसरा इलाज नसल्याने नफा होईल, या आशेवर कपाशीची शेती करणे सुरु आहे.- शेतकरी,कपाशीची पेरणी करणे परवडत नाही. परतीच्या पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. लावलेला खर्च वसूल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकºयांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. यावर्षी कापसाची शेती तोट्याची ठरली आहे.- मारोती डोंगे, शेतकरी, कोरपना
कापूस उत्पादक पर्यायी पिकाच्या शोधात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 06:00 IST
मागील काही वर्षांमध्ये कपाशीच्या लागवड खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातच यावर्षी कापसाच्या पिकावर विविध रोगांचा प्रादूर्भाव झाला. परतीच्या पावसामुळे कापसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळेनासे झाले आहे. परिणामी यावर्र्षी कापसाची शेती तोट्याची ठरत आहे.
कापूस उत्पादक पर्यायी पिकाच्या शोधात
ठळक मुद्देखर्च जास्त, नफा कमी : वरोरा, कोरपना, राजुरा व भद्रावती तालुक्यात कपाशीचा सर्वाधिक पेरा