शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

ग्रामपंचायत निवडणुकीतील कार्यकर्त्यांचीही कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 05:00 IST

पहिल्या टप्प्यात १६ हजार ६९ फ्रंटलाईन वर्कर  अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. त्यातही प्राधान्यानाने   आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांना लस टोचली जाणार आहे. लस टोचण्यासाठी ५२९ लस टोचकांचे व २५३ सुपरवायझर यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. प्रत्येक लसीकरण सत्रात १०० लाभार्थ्यांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची सूचना : लस टोचण्यासाठी ५२९ टोचकांना प्रशिक्षण

  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील  पाच हजार अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत निवडणूक उमेदवार, कार्यकर्ते व कार्यरत कर्मचारी,  मंगल कार्यालय व लॉनमधील कर्मचारी, बँडवाल्यांची कोरोना तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मंगळवारी आयोजित जिल्हा शिघ्र कृती दल  समितीची बैठकीत  दिल्या.  यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, मनाचे आयुक्त राजेश मोहिते, पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, निवासी जिल्हाधिकारी मनोहर गव्हाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.संदीप गेडाम  उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात १६ हजार ६९ फ्रंटलाईन वर्कर  अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. त्यातही प्राधान्यानाने   आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांना लस टोचली जाणार आहे. लस टोचण्यासाठी ५२९ लस टोचकांचे व २५३ सुपरवायझर यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. प्रत्येक लसीकरण सत्रात १०० लाभार्थ्यांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लसीकरण सत्राच्या ठिकाणी एक प्रतिक्षालय, एक लसीकरणाची खोली व लसीकरणानंतर संबंधितांची पाहणी करण्याकरिता एक ऑब्जर्वेशन रुम असेल. प्रत्येक पथकामध्ये एकूण पाच लसीकरण अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी गुल्हाणे यांनी दिली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संग्राम शिंदे, जिल्हा शिक्षणाधिकारी (मा.) उल्हास नरड, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्रा.) दिपेंद्र लोखंडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद किन्नाके, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश साठे, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविष्कार खंडाळे, युएनडीपीचे जिल्हा प्रतिनिधी गणेश धोटे व इतर संबंधित अधिकारी  उपस्थित होते. लसीकरणासाठी १ हजार ८२० स्थळांची निवडलसींची साठवणूकीसाठी  जिल्हा व उपजिल्हा लस भंडार, एक मनपा लस भंडार व इतर ७८ शितसाखळी केंद्र सज्ज आहेत. सर्व केंद्र मिळून लस साठवणूकीकरीता ९४ आयएलआर व ११२ डिप फ्रिजर शितसाखळी उपकरणे उपलब्ध आहेत. लसीकरणाकरीता १, ८२० स्थळांची निवड झाली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक