सीएसआर फंड : सुधीर मुनगंटीवारांचा पुढाकारचंद्रपूर : महानिर्मिती कंपनीतर्फे सांघिक सामाजिक जबाबदारी कार्यक्रमांतर्गत (सीएसआर) चंद्रपूर तालुक्यातील ग्रामीण भागात ३ कोटी १७ लाखांची विकासकामे मंजूर करण्यात आली. राज्याचे वित्त आणि नियोजन, वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी पुढाकार घेतला होता, हे विशेष.महानिर्मिती कंपनीच्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रांतर्गत प्रभावित गावांमध्ये सीएसआर निधीच्या माध्यमातून विकासकामे मंजूर करण्यात यावी, यासाठी मुनगंटीवार यांनी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. या मंजूर विकास कामांमध्ये तालुक्यातील विचोडा (बु) येथे १५ लाखांचे सामाजिक सभागृहाचे बांधकाम, पदमापूर येथे १० लाख रुपयांचे सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम व तीन लाखांचे आरोग्य उपकेंद्राच्या दुरूस्तीचे काम, भटाळी येथे १५ लाखांचे स्मशानभूमी रोडचे बांधकाम व पाच लाखांचे आरोग्य उपकेंद्राच्या नूतनीकरणाचे काम, चांदसुर्ला येथे १५ लाखांचे सिमेंट रोड व नाली बांधकाम, कढोली येथे १० लाखांचे सिमेंट रोड व नाली बांधकाम व २० लाखांचे कढोली ते इरई डॅम रस्त्याच्या पोचमार्गाचे डांबरीकरण, वढोली येथे १५ लाखांचे जि.प. शाळा ते वढोली गावापर्यंत कॉंक्रीट रोडचे बांधकाम व पाच लाखांचे सामाजिक सभागृहाचे बांधकाम, किटाळी येथे २० लाखांचे सिमेंट रोड व नाली बांधकाम व २० लाखांचे किटाळी-पद्मापूर-भटाळी फाटा ते इरई डॅम रोडचे डांबरीकरण, पाच लाख रूपये किमतीचे आगरझरी हनुमान मंदिराजवळ सभागृहाचे बांधकाम, चार लाख रू. किंमतीचे शांतीनगर (किटाळी) येथे सिमेंट रोड व नाली बांधकाम, १० लाख रू. किंमतीचे दुगार्पूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणाचे काम व पाच लाख रू. किंमतीचे वार्ड क्र. २ दुर्गापूर येथील २०० मीटर नाली बांधकाम यासह ऊर्जानगर (नेरी) वार्ड क्र.६ येथे २३ लाख रू. किंमतीच्या रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे, ऊर्जानगर वार्ड क्र.५ येथे आठ लाख रू. किंमतीचे बौध्द विहाराजवळ संरक्षक भिंतीचे बांधकाम व २६ लाख रू. किंमतीच्या रस्त्याच्या डांबरीकरणाची कामे, ऊर्जानगर वार्ड क्र. ५ येथे ५ लाख रू. किंमतीचे सिमेंट रस्त्याचे बांधकाम, ऊर्जानगर वार्ड क्र. १ समतानगर येथे अंगणवाडीला दहा लाख रू. किंमतीचे संरक्षक भिंतीचे बांधकाम, ऊर्जानगर वार्ड क्र. १ समतानगर येथे २० लाख रू. किंमतीचे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम, ऊर्जानगर वार्ड क्र. १ समतानगर येथे १५ लाख रू. किंमतीचे रस्ते व नाली बांधकाम, बियानीनगर अंतर्गत १५ लाखांचे काम आदी विकासकामांचा समावेश आहे.
महानिर्मिती कंपनीतर्फे सव्वा तीन कोटींच्या विकासकामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2016 00:52 IST