लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांकडील कापूसही घरातच लॉकडाऊन झाला आहे. सीसीआयची खरेदी लॉकडाऊनच्या काळात बंद केल्यामुळे पावसाच्या तोंडावर आजघडीला जिल्ह्यातील २० हजारांवर शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना खरीप हंगामाची चिंता सतावत आहे.चंद्रपूर, कोरपना, राजुरा, भद्रावती, वरोरा, गोंडपिपरी, चिमूर या तालुक्यांमध्ये कापसाचे उत्पन्न घेतले जाते. कापूस विकून आलेल्या पैशातून शेतकरी खरीप हंगामाची जुळवाजुळव करतात. यावर्षी मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने मार्च महिन्यापासून सर्व व्यवहार बंद पडले. दोन ते अडीच महिन्याननतर संचारबंदी काही प्रमाणात शिथील झाल्यानंतर काही जिनिंगमध्ये सीसीआयची खरेदी सुरु केली. परंतु सीसीआयमध्ये कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणीची अट घातली. कापूस उत्पादक तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी विक्रीसाठी नोंदणी केली. त्यापैकी आतापर्यंत केवळ ८ हजार ४२१ शेतकऱ्यांचा कापूस सीसीआयने खरेदी केला. तर १९ हजारांवर शेतकऱ्यांचा कापूस आजही घरातच पडून आहे. काही सीसीआयच्या केंद्रांवरील शेतकऱ्यांचा कापूस पूर्ण खरेदी केला असून, काही बाजार समित्यांमार्फत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस अजूनही खरेदी करण्यात आलेला नाही. त्यामुळे वर्षभर कष्ट करुन पिकविलेला कापूस घरातच पडून असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत.संचारबंदीत काही प्रमाणात सुट दिल्यानंतर कापूस विक्रीसाठी गर्दी होवू नये यासाठी बाजार समितीर्त्यांमार्फत नोंदणी करावी, अशी अट घालण्यात आली होती. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांनी घरात पडून असलेला कापूस विकण्यासाठी नोंदणीसुद्धा केली. मात्र, एकादिवशी ठरवून दिलेल्या संख्येइतकीच वाहनातील कापसाची खरेदी होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना आतापर्यंत आपला कापूस विकता आला नाही. आता पावसाळा सुरू झाला आहे. पेरणीची लगबग सुरू झाली असताना शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत आहे.चंद्रपूर कृउबाकडे चार हजारांवर नोंदणीजिल्ह्यातील इतर बाजार समित्यांप्रमाणे चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत चार हजार २१ शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली होती. आतापर्यंत यापैकी केवळ २२६ शेतकऱ्यांचा कापूस सीसीआयने खरेदी केला आहे. अजूनही चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यातील ३ हजार ७९५ शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सीसीआय कापूस खरेदी केंद्र सर्व शेतकऱ्यांना विक्रीसाठी खुले करण्यासंदर्भातील पत्र चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांला दिले आहे. जिल्ह्यातील सीसीआयचे सर्व केंद्र कापूस विक्रीसाठी खुले केल्यास शेतकऱ्यांचा कापूस सीसीआय केंद्रामार्फत खरेदी केला जावू शकेल, असेही या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी या पत्रावर काय निर्णय घेतात, यावर शेतकºयांकडील कापसाचे भवितव्य अवलंबू आहे.
२० हजारांवर शेतकऱ्यांना कापूस विक्रीची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST
संचारबंदीत काही प्रमाणात सुट दिल्यानंतर कापूस विक्रीसाठी गर्दी होवू नये यासाठी बाजार समितीर्त्यांमार्फत नोंदणी करावी, अशी अट घालण्यात आली होती. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांनी घरात पडून असलेला कापूस विकण्यासाठी नोंदणीसुद्धा केली. मात्र, एकादिवशी ठरवून दिलेल्या संख्येइतकीच वाहनातील कापसाची खरेदी होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना आतापर्यंत आपला कापूस विकता आला नाही.
२० हजारांवर शेतकऱ्यांना कापूस विक्रीची चिंता
ठळक मुद्देआर्थिक ताण : पावसाळा आला तरीही विक्री नाही