शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

बाल संरक्षण समित्या गायब

By admin | Updated: February 20, 2015 00:55 IST

राज्यात केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल संरक्षण योजना अस्तित्वात आली. बाल कल्याण कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले.

अनेकश्वर मेश्राम बल्लारपूरराज्यात केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल संरक्षण योजना अस्तित्वात आली. बाल कल्याण कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले. त्याप्रमाणे शासन निर्णय शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत निर्गमित करण्यात आला. मात्र याची पूर्तता अद्यापही करण्यात आली नाही. गाव, शहर व तालुका स्तरावर बाल संरक्षण समित्या आजतागायत स्थापनच करण्यात आल्या नाही. जणू त्या फाईलीतच गायब झाल्या. गावपातळीवर प्रजासत्ताक दिनी ग्रामसभेच्या माध्यमातून बालसंरक्षण समिती गठीत करण्याचे निर्देश देण्यात आले होते, हे विशेष. बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून बालकांना आवश्यक सुविधा व सेवा पुरविणाऱ्या संस्थाचे बळकटीकरणाचे काम करण्याचे धोरण आहे. शासकीय व निमशासकीय संस्थेतील बालकांची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे सांगण्यात आले आहे. बालकांच्या संरक्षणाबाबतीत सर्व विभागाकडून गुणात्मक व सांख्यिकीय माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत. कौटुंबिक व सामाजिक स्तरावर बाल संंरक्षणाला बळकटी देण्याचे नियोजन आहे. समाजामध्ये जनजागृती, सोयीसुविधा पुरविणाऱ्या शासकीय व सामाजिक संस्थामध्ये समन्वयाची भूमिका पार पाडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. बाल न्याय अधिनियम २०००(२००६) अन्वये ग्राम व तालुका पातळीवर यंत्रणा प्रतिबंधात्मक व उपचारात्मक बालकांसाठी संरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी बाल संरक्षण समिती कार्यरत राहण्यासाठी गठीत करावयाची होती. मात्र प्रशासनाच्या अनास्थेमुळे शासन निर्णय केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. बालकांविरोधी हिंसा थांबविण्यासाठी याचा उपयोग होणे गरजेचे असताना, त्यांच्यातील शोषण कमी करण्यासाठी उपयुक्त समिती महत्त्वाची भूमिका बजावणारी असली तरी अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षणामुळे याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते.याच बाबीला अनुसरुन ग्रामस्तरावर, तालुका स्तरावर व नगर स्तरावर बाल संंरक्षण समिती स्थापन करण्यासंदर्भात शिक्षण विभागाला निर्देशित करण्यात आले होते. मात्र संबंधित विभागाने याकडे लक्ष न दिल्याने बालकांच्या न्याय हक्काच्या समित्या अडगळीत पडल्या आहेत. समितीचा कालावधी व बैठकाबाल संंरक्षण समितीचा कालावधी तीनही स्तरावर समितीे गठीत झाल्यापासून पाच वर्षाचा ठरविण्यात आला आहे. एखाद्या सदस्याने राजीनामा दिल्यास सभा आयोजित करून ती रिक्त जागा भरण्याची तरतूद करण्यात आली आहे. समितीच्या बैठका महिन्यातून एकदा नियमित होणे गरजेचे आहे. सभा स्थानिक ग्रामपंचायतीच्या कार्यालयात अथवा शाळेच्या प्रांगणात घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. समितीच्या कार्य अहवालाची सूचना जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्याकडे अंमलबजावणीसाठी देणे क्रमप्राप्त आहे. गाव समितीचा दरमहा अहवाल तालुका समितीच्या व तालुका समितीचा अहवाल जिल्हा समितीकडे पाठविण्याची क्रमवारी आहे. गावपातळीवर समितीची रचनाबाल संरक्षण समितीत एकूण ११ जणांचा समावेश करण्यात आला आहे. यात अध्यक्ष म्हणून सरपंच किंवा ग्रामपंचायतीने नियुक्त केलेल्या एका सदस्याला राहता येते. सचिव म्हणून गावातील एक अंंगणवाडी सेविका राहील. सदस्यात पोलीस पाटील, आशा सेविका, प्राथमिक अथवा माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अथवा शिक्षक, गावातील शाळा व्यवस्थापन समितीच्या एक अध्यक्ष, तीन गावातील सामाजिक प्रतिनिधी, १२ ते १८ वयोगटातील एक मुलगा प्रतिनिधी, याच वयोटातील एक मुलगी प्रतिनिधी अशी गावपातळीवर बाल संंरक्षण समितीची रचना करण्यात आली आहे.असे आहेत समितीचे कार्यबालकांच्या समस्याचा शोध घेण्याच्या अनुषंगाने गावातील काळजी व संरक्षणाची गरजवंत बालकांची माहिती एकत्रित करून कारणीभूत घटक ठरविणे. त्यावर वार्षिक नियोजन करून बाल हक्क व बालकांच्या सहभागासाठी जनजागृती करण्याचे धोरण आहे. बालकांना व कुटुंबाला आधार मिळेल, अशा योजनेचा लाभ देणे, तसेच उपाय योजनात्मक कार्य म्हणून शारिरीक किंवा लैंगिक अत्याचार, शोषण निवारण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडणे. बालकांवर परिणाम करणाऱ्या समस्यावर उपाय शोधणे अत्याचारासंदर्भात कायदेशीर भूमिकेत सहकार्य करणे, ग्रामस्तरावर कृती दल स्थापन करणे आदींचा समावेश आहे.