शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

बाबा आमटेंनी २५ वर्षांपूर्वीच साकारले जलशिवार

By admin | Updated: October 9, 2015 01:43 IST

घोषणाच्या दगडावर ठेचाळत जाणाऱ्या देशाला विकासाच्या राजरस्त्यावर आणायचे असेल तर तेथे नवा आचार-विचार रूजवला पाहिजे,...

१ हजार २१९ एकर शेतीचे केले नंदनवन : ८ बंधारे, २४ तलाव, १९ विहिरीराजू गेडाम मूलघोषणाच्या दगडावर ठेचाळत जाणाऱ्या देशाला विकासाच्या राजरस्त्यावर आणायचे असेल तर तेथे नवा आचार-विचार रूजवला पाहिजे, असे मत व्यक्त करणारे कुष्ठरोग्यांचे मसिहा बाबा आमटे यांनी सोमनाथ येथे नवनवीन कल्पना साकारून बारमाही शेतीचे ज्वलंत उदाहरण निर्माण केले आहे. वरूणराजाच्या अवकृपेने कोरड्या दुष्काळाचे अस्मानी संकट ओढविण्याआधीच आवश्यक तेथे बंधारे बांधुन पावसाचे पाणी अडविण्याचा व तलावात बारमाही शेती करता येईल, अशी सिंचन व्यवस्था निर्माण केल्याचे सोमनाथ येथे बघायला मिळते. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली जल शिवार योजना बाबा आमटे यांनी २५ वर्षापूर्वी सोमनाथ येथे साकारल्याने १ हजार २१९ एकर जमिनीत धानासोबत विविध पालेभाज्या, फळभाज्या, पशुपालन, दुग्ध व्यवसाय आदींनी परिपूर्ण झाल्याचे दिसून येते. बाबा आमटे हे सन १९६७ ला सोमनाथला आल्यानंतर शासनाने ताडोबा जंगलातील १९२४ एकर जमीन महारोगी सेवा समितीला दिली. परिसरातील शेतकऱ्यांना ५५३ एकर शेती दिल्यानंतर समितीकडे १ हजार २१९ एकर खडतर जमीन शिल्लक राहिली. जंगलातील खळतर जमीन असताना या जमिनीत परिश्रमातून नंदनवन फुलवू शकतो, हा आत्मविश्वास बाबा आमटे यांना असल्याने त्यांनी प्रयत्नातुन जे हवयं ते साकारलं. जंगलात बंधारा बांधुन पाणी अडविण्याचे व पाण्याचा स्त्रोत वाढविण्याचे काम त्यावेळी करण्यात आले. जमिनीला मृत स्वरूप देण्यासाठी आपल्या सहकार्याच्या माध्यमातून त्यांनी शेती योग्य जमीन तयार केली. त्यावेळी सोमनाथ जंगलात विविध हिरण श्वापदांचा वावर असताना देखील त्याकडे लक्ष न देता आपले अविरत काम सुरू केले. त्यामुळे खळताड जमिनीत ‘अंकुर’ फुटायला लागले. ही कल्पना बाबा आमटेनी आपल्या कल्पनेतून साकारली. पावसाचे पाणी योग्य पद्धतीने अडवले तर शेतीला बारमाही पाणी मिळू शकते हा आत्मविश्वास त्यांचा होता. सन २००९-१० मध्ये दुष्काळाचे सावट असल्याने या वर्षात ताडोबा जंगलातील मोठ्या नटराजवळ ‘स्वरानंद’ हा रंजनी कार्यक्रम मुंबई येथे आयोजित करून मिळालेल्या १७ लाख रुपयातुन टायर व सिमेंटनी पक्का बंधारा बांधला. या बंधाऱ्यातील पाणी अडल्याने खालचा तलाव, विहीरी यांचे जलस्त्रोत वाढले. या सिमेंट बंधाऱ्यामुळे पुन्हा ६ लहान बंधारे, १६ मोठे तलाव, ६ लहान तलाव, ६ पिण्याच्या पाण्याच्या विहीरी, १३ शेतीच्या विहीरी भरगच्छ भरल्या. पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन झाल्याने आज सोमनाथ येथे ९०० ते १००० एकर शेतीत धान पीक घेतले जाते. जवळपास ४ हजार ५०० क्विंटल धानाचे उत्पादन घेतले जात असून बाजार भावाप्रमाणे दीड कोटीचे धानाचे उत्पादन होते. तर जवळपास २० लाखाचे भाजीपाला पीक उत्पादन केला जातो. दुध, पशुपालन, मत्स पालन आदी केल्याने दुधाची निर्मीती होत आहे. तसेच माशांचे सुद्धा उत्पादन होऊन आर्थिक भर पडल्याचे दिसून येते. आज बाबा आमटे नसले तरी डॉ. विकास आमटे यांची वेळोवेळी सोमनाथ येथे भेट होऊन संपुर्ण १ हजार २१९ एकर शेतीचा परिसर हुडकून काढतात. त्यांच्या सोबतीला सोमनाथ येथील अरुण कदम, हरिभाऊ बढे हे विशेष लक्ष घालत असल्याने सोमनाथ येथे ‘हरितक्रांती’ झाल्याचा भास होताना दिसतो. शासनाने जलयुक्त शिवार योजना या वर्षात सुरू केली असली तरी बाबा आमटे यांच्या ‘सोमनाथ’ येथे २५ वर्षापूर्वीच मुहुर्तमेढ रोवली गेली होती.