जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या २३ हजार ७६० वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ९९७ झाली आहे. सध्या ३६४ बाधितांवर उपचार सुरू आहेत. दोन लाख १४ हजार ९६१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख ८९ हजार ६२० नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात ३९९ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी जिल्ह्यातील ३६०, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १८, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. आज बाधित आढळलेल्या ६४ रुग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील २९, बल्लारपूर ११, भद्रावती दोन, ब्रह्मपुरी दोन, नागभीड चार, सिंदेवाही पाच, मूल दोन, गोंडपिपरी एक, राजुरा एक, चिमूर एक, वरोरा चार, कोरपना एक व इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे.
एकाच दिवशी ६४ कोरोनाबाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:52 IST