बॉक्स
मास्कचा होतोय वापर
शहरातून लांब पल्ल्याच्या धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सची पाहणी केली असता यामध्ये प्रवाशांनी मास्कचा वापर केल्याचे पाहावयास मिळाले. तसेच एका सीटवर एकच प्रवासी बसलेला होता. कोरोनामुळे प्रत्येकजण आपापल्या जागेची काळजी घेत असल्याचे यावेळी दिसून आले.
बॉक्स
कारवाईसाठी नेमले पथक
खासगी ट्रॅव्हल्समध्ये कोरोना नियमांचे पालन होते की नाही, याची पाहणी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने एका पथकाची नियुक्ती केली आहे. ट्रॅव्हल्सधारकांकडून नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येते.
बॉक्स
ई-पास बंधनकारक
परजिल्ह्यात प्रवासी वाहतूक करावयाची झाल्या ई-पास बंधनकारक करण्यात आला आहे. जर प्रवाशांकडे इ-पास नसेल तर त्याच्या ॲन्टिजन चाचणीचा अहवाल, आधार कार्ड आवश्यक आहे. तेव्हाच त्याला ट्रॅव्हल्समध्ये प्रवेश दिला जात असल्याचे एका ट्रॅव्हल्समालकांनी सांगितले.
बॉक्स
अशी आहे आकडेवारी
रोज जिल्ह्यातून जाणाऱ्या ट्रॅव्हल्स १०
रोज शहरात येणाऱ्या ट्रॅव्हल्स ०५
प्रवाशांची संख्या ३५०