कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी जिल्ह्यात १६ हजार ५२५ जणांनी नोंदणी केली. यामध्ये केंद्र, राज्य, खासगी आरोग्य कर्मचारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सहा श्रेणीतून १६ ते २९ जानेवारीदरम्यान १६ हजार ५२५ पैकी ६ हजार ९०० जणांना लस टोचण्याचे उद्दिष्ट होते. त्यातील ५ हजार १२४ जणांना (७४ टक्के) लस टोचण्यात आली. यातील ११ हजार ४११ जणांना लस देणे शिल्लक आहे. मात्र, आरोग्याचे फायदे लक्षात येताच हेल्थ केअर व फ्रन्टलाईन कर्मचारी आता स्वत:हून लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. मूल, सिंदेवाही व चिमूर केंद्रातही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विहित मुदतीतच कोरोना लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बुधवारपासून सहा नवीन लसीकरण केंद्र
लसीकरणाचा प्रतिसाद लक्षात घेऊन ३ फेब्रुवारीपासून नागभीड, बल्लारपूर, कोरपना, गडचांदूर, सावली, व गोंडपिपरी येथेही लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे़, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी दिली.