लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कापूस खरेदीची कोंडी दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मागील आठवड्यात जिनिंग मालक व व्यापाऱ्यांची बैठक पार पडली. शेतकऱ्यांची अडवणूक न करता जादा गाड्यातील कापूस खरेदीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, या आदेशाला ठेंगा दाखविल्याने राजुरा, कोरपना, चंद्रपूर, भद्रावती व वरोरा तालुक्यातील ५० टक्के शेतकºयांचा कापूस खरेदीअभावी घरातच पडून असल्याचे चित्र आहे.राजुरा कोरपना तालुक्यात शासनाने केवळ ४ केंद्रावर कापसाची नाममात्र खरेदी सुरू आहे. सीसीआयमार्फत कापूस खरेदी करण्यासाठी राजुरा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे ८ हजार तर कोरपना बाजार समितीकडे ७ हजार ५०० पेक्षा अधिक कापूस गाड्यांची नोंदणी शेतकऱ्यांनी केली आहे. दोन्ही तालुक्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी असल्याने सर्वच जिनिंगवर सीसीआयकडून कापूस खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करीत आहे. पीक कर्ज फेडून नवीन कर्ज घेण्यासाठी बँकांसमोर गर्दी करू लागला. परंतु, लॉकडावूनचा गैरफायदा व्यापारी घेत आहेत. कापूस खरेदीवर शासनाचे नियंत्रण नसल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाची अवहेलना करणाऱ्या व्यापाऱ्यांवर चौकशी करून गुन्हे दाखल करावे, अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा चंद्रपुरातील ज्येष्ठ विधीतज्ञ अॅड. पुरूषोत्तम सातपुते, माजी आमदार सुदर्शन निमकर, सुधाकर गोरे, ज्ञानेश्वर बेरड, काशीनाथ गोरे व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आदींनी मागील आठवड्यात जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे दिला होता. परंतु, त्यानंतरही जिल्ह्यातील कापूस खरेदीला वेग आला नाही. शेकडो शेतकरी केंद्रासमोर ताटकळत असून वाहनभाडे व अन्य खर्चाचा भुर्दंड बसणार आहे.पैशाअभावी खरीप हंगाम संकटातपाऊस सुरू होण्याआधीच शेतकऱ्यांचा कापूस विकला जाणे अत्यावश्यक आहे. खरीप हंगामासाठी बियाणे व खते विकत घेण्याकरिता कापशी पिकाचाच मोठा आधार असतो. परंतु, सीसीआयच्या खरेदीला वेग नाही. कापूस विकला नाही तर हंगाम कसा करणार, याची शेतकऱ्यांना चिंता आहे.सीसीआयची तालुकानिहाय खरेदीराजुरा येथील केंद्रावर ७ हजार ८०० शेतकºयांनी नोंदणी केली. सीसीआयने फक्त २५२ गाड्यांतील कापूस खरेदी केला. कोरपना येथील उत्पन्न बाजार समितीत ७ हजार ६३८ नोंदणी केल्यानंतर ५४५ गाड्या, चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ३ हजार ९६७ शेतकऱ्यांची नोंदणी व खरेदी १७० गाड्या, भद्रावती कृषी बाजार समितीत २ हजार ८५७ शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यानंतर आतापर्यंत ४२० गाड्यांतील कापूस सीसीआयने खरेदी केला आहे.
५० टक्के कापूस घरातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:00 IST
दोन्ही तालुक्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी असल्याने सर्वच जिनिंगवर सीसीआयकडून कापूस खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करीत आहे. पीक कर्ज फेडून नवीन कर्ज घेण्यासाठी बँकांसमोर गर्दी करू लागला. परंतु, लॉकडावूनचा गैरफायदा व्यापारी घेत आहेत.
५० टक्के कापूस घरातच
ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाच्या आदेशाला ठेंगा : खरेदीअभावी शेतकऱ्यांची कोंडी