चिखली : कॉग्रेसने जनसामान्यासाठी देश पातळीवर कित्येक योजना अंमलात आणल्या, परंतू ह्या योजना प्रत्यक्षात सर्व सामान्य नागरीकांपर्यत पोहचविण्यात आम्ही कमी पडलो. तेव्हा आता ही मरगळ झटकून जनतेला न्याय देण्यासाठी कार्यकर्त्यांनी आक्रमकतेने पुढे सरसाविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आ. राहुल बोंद्रे यांनी चिखली विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांची चिंतन बैठकीत केले. या चिंतन बैठकीसाठी राज्य सनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष शाम उमाळकर, तालुकाध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी, सुधाकर धमक, जगन्नाथ पाटील, भारत गवई, विजय खरात, जि.प.सदस्य अशोकराव पडघान, अंकुशराव वाघ, डॉ. खबुतरे यांची उपस्थिती होती.
कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागावे
By admin | Updated: May 30, 2014 23:50 IST