साखरखेर्डा : या परिसरातील अनेक शेतकर्यांनी लागवड केलेल्या कपाशी बियाण्याची उगवण क्षमता ५0 टक्के घटल्यामुळे शेतकर्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत कृषी विभागाने त्वरित सर्व्हे करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा परिसरातील अनेक शेतकर्यांनी कपाशीची लागवड केली होती. मात्र अनेक शेतकर्यांच्या शेतातील कपाशीच्या बियाण्याची उगवण क्षमता ५0 टक्के घटली आहे. शास्त्रयुक्त पद्धतीने लागवड करुनही नागपूर येथील नामांकित कंपनीचे बियाणे बोगस निघाल्याने चक्क ५0 टक्के कपाशीची उगवण क्षमता घटली. त्यामुळे शेतकर्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.साखरखेर्डा येथील जीवनसिंग राजपूत यांनी मे महिन्यात कपाशीची लागवड केली होती. ओलिताची पुर्ण व्यवस्था असल्याने कपाशी चांगली बहरली. परंतू, काही खोडांची उगवण जागीच थांबल्याने ५0 टक्के कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. एक फुटाच्या खोडाला १२ ते १५ बोंड्या आहेत. तर तीन ते चार फुटापर्यंत वाढलेल्या कपाशीला पाते आणि बोंड्या आलेल्या आहेत. ५0 टक्के कपाशी खराब असल्याने बियाण्यात मोठय़ा प्रमाणात भेसळ झाल्याची तक्रार जीवनसिंग राजपूत यांनी तालुका कृषी अधिकारी रामदास पाटील, पं.स.चे अशोक सानप, तहसिलदार संतोष कणसे यांच्याकडे निवेदनाद्वारे दिली आहे. तसेच संबंधीत कंपनीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही शेतकर्यांने केली आहे.
बियाण्याची उगवण क्षमता घटली
By admin | Updated: August 3, 2014 23:51 IST