सिंदखेडराजा: तालुक्यात हरीण, रानडुक्कर यांची मांसविक्री खुलेआम होत असून, वनविभागाने यावर काहीच कारवाई केली नाही. परिसरात अनेक महिला खुलेआम हातात घोरपड घेऊन विक्री करीत असल्याचे चित्र दिसून आले. किनगावराजा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सोनोशी, आडगावराजा रस्त्यावर गावठी बंदुकीचा वापर करुन दोन पाडसांची शिकार दोन महिन्यापूर्वी झाली होती. त्यापैकी एक पाडस किनगावराजा पोलीस स्टेशनपर्यंत पोहचले होते. तर एका पाडसाचे तुकडे करुन मांस विक्री करण्यात आली होती. पाडसाचे मांस विक्रीचे ठिकाण सर्वांना माहित आहे. त्याचप्रमाणे रानडुकराचीही शिकार करुन साखरखेर्डा, वडगावमाळी, सवडद, वाघाळा या भागात मोठय़ा प्रमाणात मांस विक्री होते. याची माहिती स्थानिक पोलिस स्टेशनला दिल्यानंतर केवळ वनविभागाच्या असहकार धोरणामुळे पोलिस कर्मचारी या पशुहत्येपासून दोन हात दुरच राहतात. साखरखेर्डा बसस्थानकावर १५ दिवसापूर्वी मोराचे मांस विक्रीकरीता आले होते. पण ते परस्पर विक्री झाल्याने ग्राहकाचा आणि विक्रेत्याचा शोध लागला नाही. तर ४ ऑगस्ट रोजी विशेष श्रावण महिन्यात सकाळी १0 वाजता खुलेआम एक महिला हातात ४ किलो वजनाची घोरपड घेऊन ग्राहकांच्या शोधात होती. प्रत्येक खानावळ आणि धाब्यावर जाऊन ग्राहक मिळतो काय? हे पाहत होती. एका घोरपडची किंमत हजाराच्या घरात असल्याने ग्राहक मिळणे कठीणच तरीही स्वत:चे चोचले पुरविण्यासाठी अशा पशुच्या मासांची खरेदी करतातच, असेही आढळून आले. याकडे वनविभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.** दुर्मीळ वन्यजीवाची खुलेआम कत्तललोकांच्या जीभेचे चोचले पुरविण्यासाठी दुर्मिळ वन्यजीवांची सिंदखेडराजा तालुक्यात खुलेआम कत्तल सुरु असल्याचे वास्तव आहे. पावसाळ्यात हा गोरखधंदा तेजीत चालतो. यामध्ये राष्ट्रीय पक्षी मोर व साहसी प्राणी घोरपड यासारख्या वन्य जीवांशी खेळण्याचे अघोरी साहस काही लोक करीत आहेत. याकडे वन्यजीव विभाग, वनविभाग व पोलिस प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्या कार्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
घोरपडची राजरोस विक्री
By admin | Updated: August 8, 2014 00:30 IST