शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

पावसाच्या विलंबानंतरही शेतकर्‍यांचे कापसालाच प्रधान्य

By admin | Updated: August 8, 2014 00:30 IST

सोयाबीनच्या पेर्‍यात वाढ, मक्यात मोठी घट

जळगाव: तालुक्यात तब्बल एक महिना पाऊस उशीरा येवूनही शेतकर्‍यांनी नगदी पीक असलेल्या कापूस पिकाला प्राधान्य देत मागीलवर्षीपेक्षा कपाशीचा पेरा ४४६ हेक्टरने जास्त केला. तर सोयाबीनच्या पेर्‍यातही अकराशे हेक्टरची वाढ झाली आहे. तुलनेत मागील वर्षी भाव न मिळाल्याने यावर्षी मका पिकाचा पेरा निम्म्यावर आला आहे. जुलै अखेरपर्यंत सरासरी ३४६ मि.मी. पावसाची नोंद झाली असून वर्षभरात अपेक्षित पावसापेक्षा हा पाऊस निम्मे झाला आहे.जळगाव तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ ५0८0४ हेक्टर असून लागवडीखालील क्षेत्र ४१ हजार ९0२ हेक्टर आहे. मागीलवर्षी १९0८८ हेक्टर कापसाचा पेरा झाला होता. त्यामध्ये यावर्षी ४४६ हेक्टरची वाढ होवून १९ हजार ५३४ हेक्टर कापसाची लागवड झाली आहे. वास्तविक यावर्षी तब्बल एक महिना उशीरा म्हणजे १५ जुलैनंतर पेरणीला सुरूवात झाली. कापसाची उशीरा लागवड झाल्यास झडती मिळत नाही असा शेतकर्‍यांचा समज असूनही मागील वर्षी कापसाचे झालेले विक्रमी पीक आणि तुलनेत शेवटी मिळालेला योग्य भाव या पृष्ठभुमीवर शेतकर्‍यांनी या नगदी पिकाला यावर्षीही प्राधान्य दिले आहे. लागवडीखालील एकुण क्षेत्रफळापैकी निम्मे क्षेत्रफळावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. सोयाबीनच्या लागवडीतही दरवर्षी वाढ होत आहे. मागीलवर्षी सोयाबीनचा पेरा ८ हजार ६३९ हेक्टर होता. त्यामध्ये अकराशे हेक्टरची वाढ होवून यावर्षी ९ हजार ७३६ हेक्टरवर या पिकाची लागवड करण्यात आली आहे. मका पिकाच्या लागवडीकडे यावर्षी शेतकर्‍यांनी पाठ फिरविली आहे. मागीलवर्षी तालुक्यात ३ हजार २0९ हेक्टरवर मक्याची लागवड करण्यात आली होती. यावर्षी फक्त १ हजार ५४५ हेक्टरवरच मका पेरला गेला. मागीलवर्षी मक्याला योग्य भाव न मिळाल्याने या पिकाला प्राधान्य मिळाले नाही. मुंगाच्या पेर्‍यातही ५00 हेक्टरची घट झाली आहे. मागीलवर्षी हा पेरा २ हजार १२१ हेक्टर होता. यावर्षी १ हजार ६३५ हेक्टरवरच मुंग लागवड झाली आहे. उडीदाचा पेरा मात्र कायम आहे. सुमारे १५00 हेक्टरवरच या पिकाची लागवड करण्यात आली आहे. मागीलवर्षी तुरीचा पेरा ३0१२ हेक्टर होता यावर्षी ४00 हेक्टरने कमी करून तो २ हजार ६१५ वर आला आहे. ज्वारीचा पेरा यावर्षी २ हजार १३५ हेक्टर आहे. मागील वर्षी १00 हेक्टरने जास्त लागवड होती.