चिखली : स्थानिक बस स्थानक परीसरामध्ये असलेल सार्वजनिक शौचालाच बाजुला असलेल्या नालीमध्ये एका दिवसाच्या बाळास (पुरूष जातीचे अर्भक) बेवारसपणे टाकून दिल्याची घटना ३0 जुलैच्या सकाळी उघडीस आली. आकाश पचेरवाल यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी या अर्भकाला ताबत घेवून ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आहे. बुधवारी सकाळी बस स्थानकाजवळील सुलभ शौचालाच्या बाजुला असलेल नालीङ्कमध्ये पुरुष जातीचे एका दिवसाचे जिवंत अर्भक कापडामध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी या बालकाला ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका दिवसाचे जिवंत अर्भक आढळले
By admin | Updated: July 31, 2014 01:28 IST