मोबाइलमुळे आपल्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला आहे. जे मोबाइल वापरत नाहीत त्यांची मेमरी चांगली आहे. कारण आपण मेंदूला त्रास देत नाही, स्मरणशक्तीचा वापर करत नाही. त्याचे भविष्यात खूप वाईट परिणाम होऊ शकतात. वेळीच मुलांनी, पाल्यांनी सुधारायला हवं. लॉकडाऊन काळात तर मोबाइलचा वापर खूप वाढला आहे, आबालवृद्ध त्यावर व्यस्त असल्याचे आढळून येते. हे योग्य नसून याचे गंभीर पडसाद नजीकच्या काळात दिसतील, अशी भीती मानसोपचार तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
हे टाळण्यासाठी
-एक दिवस संपूर्ण कुटुंबाने मोबाइल, टीव्ही, संगणक, टॅब अशी कोणतीही स्क्रीन पाहणे टाळायचे. त्याला मोबाइल फास्ट असे नाव द्यायचे.
-झोपण्याच्या ठिकाणी मोबाइल घेऊन जाऊ नये. पुरेशी झोप घ्यायलाच हवी.
-मेमरी गेम म्हणजे बुद्धिबळ, कॅरम, स्मरणशक्तीचे खेळ प्रत्यक्ष खेळणे. मोबाइलवरील गेम नव्हे.
-पाठांतर करणे, स्तोत्र, मंत्र म्हणणे, कविता, भाषण, संवाद कला जोपासणे.
-चिंतन, मनन करणे, प्राणायाम, योग, व्यायाम करणे.
मोबाइलच्या अतिरिक्त वापरामुळे घरातील संवाद कमी झाला असून हे धोकादायक आहे. त्यात ऑनलाइन संस्कृती अधिक वाट लावत आहे. वेळीच कुटुंबाने मोबाइल फास्ट ही संकल्पना राबवावी. एक दिवस कोणतीही स्क्रीन बघायची नाही. केवळ बुद्धीचा वापर करून कार्यरत राहायचे, जेणेकरून त्या सगळ्या यंत्रणावर (ॲडिक्ट) अवलंबून राहणे कमी होईल. बुद्धिकौशल्य पणाला लावणाऱ्या खेळांना प्राधान्य देणे, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बुद्धीचा वापर करणे. योग्य झोप, व्यायाम करणे अत्यावश्यक आहे.
- डॉ. विश्वास खर्चे, मानसोपचारतज्ज्ञ
असे का होते?
विचार करण्याची प्रक्रिया न करणे
आठवणी, स्मरणशक्ती याकडे दुर्लक्ष
पाढे पाठ न करता कॅल्क्युलेटर वापरणे.
कोणत्याही गोष्टीत थेट सोपी पद्धत वापरणे.
बुद्धीचा वापर न करता शॉर्टकटकडे कल
अस्थिरता, अस्वस्थता वाढणे.