शेलगाव देशमुख : येथील लक्ष्मण गडदणे यांचे राहते घरी अज्ञात चोरट्यांनी २ जुलैच्या रात्रीदरम्यान चोरी केली असून, तेथून ७0 हजाराचा ऐवज लंपास केला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेलगाव देशमुख येथील लक्ष्मण गडदणे यांच्या राहते घरात रात्रीदरम्यान अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश केला. घरातील लाकडी कपाटातील सोन्याची १२ ग्रॅमची एकदाणी अंदाजे किंमत ३0 हजार रुपये, सोन्याच्या ८ ग्रॅमच्या बांगड्या अंदाजे किंमत २0 हजार रुपये, ४ ग्रॅमची सोन्याची अंगठी अंदाजे किंमत १0 हजार रुपये, ५ तोळ्याच्या चांदीच्या पाटल्या अंदाजे किंमत ३ हजार रुपये व रोख रुपये असा एकूण ७0 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. यासंदर्भात गजानन लक्ष्मण गडदणे यांनी डोणगाव पोलीस स्टेशनला ३ जुलै रोजी फिर्याद दिली. पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात कलम ४५७ व ३८0 भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. बुलडाणा येथील फिंगर प्रिंट तज्ञ व डॉग स्कॉडला पाचारण करुन चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास पोहेकॉ सुनिल देव हे करीत आहेत. या घटनेमुळे आधीच पावसाअभावी हैराण झालेल्या व विद्युत भारनियमनाने त्रस्त असलेल्या नागरिकांची झोपच उडाली आहे. त्यामुळे चोरट्यांचा तपास लावणे डोणगाव पोलीसांना आव्हान ठरले आहे.
७0 हजाराचा एवज लंपास
By admin | Updated: July 3, 2014 22:57 IST