खामगाव : वनातील लाकडांची अवैध लाकूडतोड व वाहतूक केल्याप्रकरणी दोघांवर खामगाव वन विभागाच्यावतीने नुकतीच अटक करण्यात आली. यातील एक आरोपी फरार असून लाकडाची वाहतूक करणारा मिनीट्रक जप्त करण्यात आला आहे. खामगाव वन परिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या शेगाव तालुक्यातील तरोडा डी येथील रेल्वेच्या हद्दीतील पिंपरण जातीच्या लाकडाची अवैध तोडणी करण्यात आली. तोडणी केल्यानंतर सदर लाकडे एम.एच.0४- एस- ६१५१ या मिनीट्रकद्वारे वाहून नेतांना शेगाव येथील देविदास जनार्दन बावस्कर, ज्ञानेश्वर देविदास बावस्कर यांना रंगेहात अटक करण्यात आली. सोबतच लाकडांची वाहतूक करणारा मिनीट्रक जप्त करण्यात आला. दरम्यान, यातील शे. चांद शे.गफूर हा आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. उपरोक्त तिन्ही आरोंपीवर भारतीय वन अधिनियम २७ कलम ४१/१, ५२/१ तसेच मुंबई वन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. वन परिक्षेत्र अधिकारी शिवाजी दहीवाल यांच्या मार्गदर्शनात वनपाल शिपे, बोबडे, शेगोकार यांनी ही कारवाई केली.
अवैध लाकूडतोड; मिनीट्रक जप्त
By admin | Updated: July 29, 2014 23:34 IST