शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

Corona Efect : ‘जिगाव’साठी यंदा केवळ २२७ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 10:14 IST

६९० कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी ३३ टक्के अर्थात अवघे २२७ कोटीच उपलब्ध होणार आहेत.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना संसर्गाच्या उद्रेकाचा अर्थकारणाला बसलेल्या फटक्याचे दृश्य परिणाम समोर येत असून २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी जिगाव प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या ६९० कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी ३३ टक्के अर्थात अवघे २२७ कोटीच उपलब्ध होणार आहेत.परिणामी जिगाव प्रकल्पासाठी करावे लागणाऱ्या भूसंपादनाची अनेक प्रकरणे व्यपगत होण्याची शक्यता असून चालू आर्थिक वर्षात प्रकल्पावरील कामाचे फेरनियोजन करण्याची वेळ या स्थितीमुळे आली आहे. त्यामुळे जिगाव प्रकल्पाचे समन्वयक कार्यकारी अभियंता सुनील चौधरी यांनी अनुषंगीक फेरनियोजन हाती घेतले असून पुनर्वसनाच्या कामासाठी १०० कोटी तर उर्वरित १२७ कोटी रुपये हे व्यपगत होणारी भूसंपादनाची प्रकरणे वाचविण्यासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. एकीकडे प्रकल्पावरील प्रशिक्षीत कामगार हा त्यांच्या स्वगृही परतत असल्याने प्रकल्पावरील अनेक तांत्रिक कामांना फटका बसला आहे. प्रामुख्याने मुख्य धरणाची कामे त्यामुळे अडचणीत येत आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २४ मार्च पासून लॉकडाउन सुरू झाला असला तरी प्रत्यक्षात जिगाव प्रकल्पावरील कामे ही २० मार्च पासूनच ठप्प झाली होती. राज्य शासनाने अत्यावशक सेवेतंर्गत जिगाव प्रकल्पाचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले तोवर बराच वेळ निघून गेला होता. दुसरीकडे प्रशिक्षीत कामगार हे गावाकडे जात असल्याने तुलनेने अप्रशिक्षीत असलेल्या कामगारांना सोबत घेऊन प्रामुख्याने पूनर्वसनाच्या कामाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे जिगाव प्रकल्पावरील एका वरिष्ठ अधिकाºयाने ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.भूसंपादनाची १२ प्रकरणे निकालीगेल्या वित्तीय वर्षात भूसंपादाची प्रकरणे निकाली काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची गरज होती. मात्र अपेक्षीत निधी मिळू शकला नाही. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात मिळालेल्या २०० कोटी रुपयातून अवार्ड स्तरावर आलेली १२ भूसंपादनाची प्रकरणे निकाली काढण्यात प्रशासनाला यश आले. कारण अवार्डस्तरावर आलेल्या प्रकरणामध्ये संपादीत जमिनीचा १०० टक्के मोबदला द्यावा लागतो. त्यादृष्टीने विदर्भ पाटबंदारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अनिल सुर्वे यांनी जोर लावून प्रयत्नपूर्वक २०० कोटी रुपये उपलब्ध केल्याने व्यपगत होणारी काही भूसंपादाची प्रकरणे मार्गी लावता आली असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

कोरोनामुळे नियोजन कोलमडलेचालू वित्तीय वर्षात जिगाव प्रकल्पासाठी ६९० कोटी रुपये मिळणे अभिप्रेत होते. तशी तरतूद करण्यात आली होती. मात्र कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटाशी सामना करण्यासाठी वित्तविभागाने चार मे रोजी विकास कामासंदर्भात महत्त्वपूर्ण उपाययोजना सुचविल्या. त्यामुळे पाटबंधारे विभागाला ६९० कोटी रुपयांपैकी प्रत्यक्षात २२७ कोटी रुपयेच यंदा मिळणार आहेत. त्यामुळे चालू वित्तीय वर्षात प्रकल्पाच्या कामाला वेग देण्याचे जलसंपदा विभागाने केलेल्या नियोजनाला फटका बसला. त्यामुळे मर्यादीत निधीमध्ये महत्त्म व दर्जेदार कामे कशी करावी याचे नियोजन हाता हाती घेण्यात आले आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प