देऊळगाव राजा : परिसरामध्ये २३ ऑगस्ट रोजी वादळी वार्यासह जोरदार पावसाने थैमान घातले. यामुळे नागपूर-पुणे मार्गावरील सातेफळ मार्गानजीक जुना पूल वाहून गेला.देऊळगावराजसह ग्रामीण भागात सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास वादळी वार्याने तडाखा दिला. सायंकाळी सुरू झालेला हा पाऊस रात्रभर सुरू होता. शिवाय रात्री शहरातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला; मात्र बर्याच ठिकाणी पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले. यादरम्यान सातेफळनजीकचा जुना पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशी केली असता, सदर पुलाचे काम त्वरित करण्याबाबत प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.
जोरदार पावसामुळे पूल खचला
By admin | Updated: August 25, 2014 01:56 IST