केळवद : भरधाव जाणार्या दुचाकीची निंबाच्या झाडाला धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना बुलडाणा-चिखली रस्त्यावर आज बुधवार, ३0 जुलै रोजी सायंकाळी घडली. देऊळघाट येथील रहिवाशी प्रवीण पुरी व विशाल पाटील हे खासगी कामानिमित्त चिखलीवरून बुलडाण्याकडे दुचाकी क्र. एम.एच.२८/ ८२१८ वरून भरधाव वेगाने जात होते. केळवद गावाच्या पुढे भरधाव दुचाकीचे संतुलन गेले. यात दुचाकीची रस्त्यालगतच्या निंबाच्या झाडाला जोरदार धडक बसली. या धडकेत दुचाकीस्वार प्रवीण पुरी याच्या पायाला मोठी दुखापत झाली. तर विशाल पाटील याला किरकोळ मार लागला. रस्त्यावरील लोकांनी या जखमींना तातडीने बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. पुढील तपास चिखली पोलिस करीत आहेत.
दुचाकीची झाडाला धडक; एक गंभीर
By admin | Updated: July 31, 2014 01:29 IST