अमडापूर : येथील बसस्थानकाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. एकही लांब पल्ल्याची एस.टी. बस बसस्थानकामध्ये जात नाही. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकसमोर रोडवर उभे राहून एस.टी. बसेसच्या पाठीमागे धावावे लागते.टिनपत्र्याची तुटफुट झालेले आहे. प्रवाशांसाठी बांधलेली कॅन्टींग बंद पडलेली आहे. आता पावसाळा सुरू असताना प्रवाशांना एस.टी. बसेसमध्ये जाण्या-येण्यासाठी बसस्थानकामध्ये बसण्याची व्यवस्था राहिलेली नाही. या समस्याकडे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या अधिकार्यांनी व पदाधिकार्यांनी लक्ष घालून त्या बसस्थानकाची दुरूस्ती करून द्यावी, अशी मागणी जि.प.सदस्य श्याम पठाडे यांची केली आहे.
अमडापूर बसस्थानकाची दुरवस्था
By admin | Updated: August 2, 2014 23:49 IST