नोरा फतेहीचा समुद्र किनारी डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल, यूजर म्हणाला - 'रामदेव बाबासोबत डान्स?'

By अमित इंगोले | Published: October 12, 2020 03:27 PM2020-10-12T15:27:38+5:302020-10-12T15:29:03+5:30

आता नोराचा एक डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण तिचा हा व्हिडीओ एखाद्या शोमधील किंवा घरातील नाहीये. नोराचा हा व्हिडीओ आहे समुद्र किनाऱ्यावरील....

Nora Fatehi tough dance step with a friend on the beach, video goes viral | नोरा फतेहीचा समुद्र किनारी डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल, यूजर म्हणाला - 'रामदेव बाबासोबत डान्स?'

नोरा फतेहीचा समुद्र किनारी डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल, यूजर म्हणाला - 'रामदेव बाबासोबत डान्स?'

googlenewsNext

बॉलिवूडची सध्या डान्सिंग क्वीन नोरा फतेही गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांची चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तुम्ही इंडियाज बेस्ट डान्सर शोमध्ये गेस्ट जज म्हणून पाहिलं. आता मलायका अरोरा कोरोनातून बरी होऊन परतल्याने नोराहा हा शो सोडावा लागला. या शोच्या सेटवरील नोरा व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत होते. अशात आता नोराचा एक डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण तिचा हा व्हिडीओ एखाद्या शोमधील किंवा घरातील नाहीये. नोराचा हा व्हिडीओ आहे समुद्र किनाऱ्यावरील....

नोरा फतेही या व्हिडीओत समुद्रकिनारी ठुमके लगावताना बघायला मिळते. यात तिच्या मित्रासोबत डान्स करताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, 'माझा मित्र मार्सने मला समुद्र किनारी डान्स शिकवण्याचा निर्णय घेतला. अर्थातच तिच्या फॅन्सना तिचा हा वेगळा डान्स आवडला. पण काही लोकांनी काही मजेदार कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, रामदेव बाबासोबत डान्स करतेय का?

नोरा लवकरच अजय देवगनच्या 'भुज द प्राइड ऑफ इंडिया' सिनेमात दिसणार आहे. असे मानले जात आहे की, या सिनेमात ती तिच्या डान्सचा जलवा दाखवताना दिसणार आहे. नोराने आतापर्यंत तिच्या 'दिलबर', 'कमरिया', 'गर्मी', 'साकी साकी' आणि 'एक तो कम जिंदगानी' सारख्या गाण्यांमधून जगाला वेड लावलं आहे. 

एक तो कम जिंदगानी गाण्याला १ वर्ष पूर्ण

काही दिवसांपूर्वीच तिच्या एक तो कम जिंदगानी या गाण्याला एक वर्षे पुर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने तिने आता या गाण्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिने या गाण्याच्या रिहर्सल व्हिडिओसोबत फोटोदेखील इंस्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केले आहेत. 

'सत्यमेव जयते' सिनेमात नोरा फतेहीने सुष्मिता सेनचा सुपरहिट 'दिलबर गाण्याच्या रिक्रेअट व्हर्जनमध्ये डान्स केला होता. हे गाणेही प्रचंड हिट ठरले. रसिकांनीही गाण्याचे आणि नोराचे खूप कौतुक केले.यानंतर नोराने अनेक सिनेमांमध्ये आयटम डान्स केले आहेत. त्यापैकी मरजावां सिनेमातील गाणं एक तो कम जिंदगानीदेखील खूप गाजले होते आणि या गाण्याला आता एक वर्षे पूर्ण झाले आहे. अलीकडेच ती 'इंडियाज बेस्ट डान्सर्स' रिअॅलिटी शोमध्ये देखील गेली होती. 
 

Web Title: Nora Fatehi tough dance step with a friend on the beach, video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.