'कमरिया' गाण्यावरील नोरा फतेहीच्या डान्सने सोशल मीडियात धुमाकूळ, व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघताहेत फॅन्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 15:04 IST2020-09-19T15:02:09+5:302020-09-19T15:04:53+5:30
आता शोदरम्यानचा नोराचा एका व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झालाय. या व्हिडीओत 'कमरिया' गाण्यावर नोरा जबरदस्त डान्स करताना दिसली आहे.

'कमरिया' गाण्यावरील नोरा फतेहीच्या डान्सने सोशल मीडियात धुमाकूळ, व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघताहेत फॅन्स!
अभिनेत्री नोरा फतेही नेहमीच आपल्या अफलातून डान्सने सर्वांना मदहोश करते. नुकतीच नोरा फतेही डान्स रिलॅलिटी शो 'इंडियाज बेस्ट डान्सर्स'मध्ये पोहोचली होती. यादरम्यान तिने तिच्या बेली डान्सिंगने सर्वांना थक्क केलं. आता शोदरम्यानचा नोराचा एका व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झालाय. या व्हिडीओत 'कमरिया' गाण्यावर नोरा जबरदस्त डान्स करताना दिसली आहे.
नोरा फतेही या व्हिडीओत कंटेस्टंटसोबत मिळून धमाकेदार डान्स मुव्ह्स करताना दिसत आहे. तसेही जेव्हाही नोरा फतेही डान्स करते तेव्हा तेव्हा तिचे व्हिडीओ तिच्या फॅन्सकडून पसंत केले जातात. हा व्हिडीओ सुद्धा तिच्या फॅन्सना फार आवडला असून आता व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत फॅन्सच्या अनेक कमेंट आणि रिअॅक्शन येत आहेत.
नोरा फतेहीचा 'दिलबर' पासून ते 'साकी साकी' गाण्यातील अदा या डान्समध्ये बघायल्या मिळाल्या आहेत. नुकताच नोराने 'स्ट्रीट डान्सर' सिनेमात महत्वाला रोल केला होता. आता नोरा फतेही लवकरच अजय देवगन आणि संजय दत्तच्या 'भुज - द प्राइड ऑफ इंडिया' मध्ये दिसणार आहे.
दरम्यान, रिअॅलिटी डान्स शो इंडियाज बेस्ट डान्सर हा शो चर्चेचा विषय ठरत आहे. हा टीव्हीवर तिसरा सर्वात जास्त पाहिला जाणारा शो ठरला आहे. इंडियाज बेस्ट डान्सर सेटवरील ७-८ लोकांसहीत मलायका अरोराला कोरोना झाला. त्यामुळे सध्या मलायकाच्या जागी शोमध्ये नोरा फतेही दिसत आहे. नोरा या शोमध्ये आल्याने शोचा टीआरपी चांगलाच वाढलाय.
नोरा फतेही रेड ड्रेसमध्ये दिसली खूप ग्लॅमरस, फोटोंवर होतोय कमेंट्सचा वर्षाव
नोरा फतेहीचा 'प्रीतम प्यारे' गाण्यावर अफलातून डान्स करून घातला धुमाकूळ, व्हिडीओ व्हायरल