शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नियतीपुढे जिंकले योगेश्वरचे कर्तृत्व

By admin | Updated: December 3, 2015 00:44 IST

मनुष्याच्या जीवनात कितीही संकट आले, तरीही त्यावर मात करण्याचा दृढ संकल्प मनात ठेवला तर ती लिलया पार करता येतात.

अपंग खेळाडूची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत छाप : पदक जिंकूनही जगतोय उपेक्षिताचे जीवनप्रशांत देसाई भंडारालहरो से डरकर नैया पार नहीं होती !कोशिश करने वालों की हार नहीं होती !!मनुष्याच्या जीवनात कितीही संकट आले, तरीही त्यावर मात करण्याचा दृढ संकल्प मनात ठेवला तर ती लिलया पार करता येतात. वरील ओळींचा अर्थाची खुणगाठ बांधून त्यांना प्रत्यक्ष जीवनात उतरवून डोंगराएवढ्या समस्यांवर मात करून योगेश्वर रविंद्र घाटबांधे या अपंग युवकाने समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.योगेश्वर घाटबांधे याने, पोलीओमुळे अपंगत्व असतानाही त्यामुळे खचून न जाता किंवा कुठल्याही परिस्थितीची तमा न बाळगता खेळात दैदिप्यमान यश मिळविले. केवळ खेळायचे म्हणून तो खेळला नाही, तर त्यातून मिळविलेल्या यशातून त्याला जगण्याची नवी उमेद मिळाली, सोबतच समाजासाठी प्रेरणादायी ठरला. योगेश्वरने तालुका, जिल्हा नाही तर चक्क आंतरराष्ट्रीय खेळात आपल्या खेळाचा ठसा उमटविला. एक-दोन नाही तर चार वेळेस योगेश्वरने आंतरराष्ट्रीय खेळात भारताचे प्रतिनिधित्व करून पदक मिळवित स्वत:चे नाव आंतरराष्ट्रीय पटलावर कोरले.लाखनी तालुक्यातील जेमतेम २,३०० लोकसंख्या असलेल्या किटाळी गावात योगेश्वरचा जन्म अल्पभूधारक शेतकरी रविंद्र घाटबांधे यांच्या घरी झाला. सर्वसामान्य कुटुंबातील योगेश्वरला पोलीओ डोज पाजण्यात न आल्याने त्याच्यावर नियतिने अपंगत्व लादले. शिक्षणात तल्लख बुध्दीमत्ता लाभलेल्या योगेश्वरची खेळात आवड होती. मात्र, अपंगत्वाने त्याचे खेळण्याबाळगण्याचे दिवस हिरावले. दिवसामागून दिवस गेले, तसे त्याने इतिहास व मराठी या दोन विषयात एम.ए. व एम.एड. हे अभ्यासक्रम पूर्ण केले. अभ्यासासोबतच त्याला क्रीडाक्षेत्रात नाव कोरण्याची प्रगल्भ इच्छा असतानाही तो नियतीपुढे हतबल होता. खेळाची मनात जीद्द असल्याने तो नागपूर येथील विरजा अपंग संस्थेच्या संपर्कात आला. तिथे त्याला मिळालेल्या मार्गदर्शनावर जीवनात कुठल्याही प्रकारच्या स्थानिक खेळात सहभाग न घेताही त्याने २००७ मध्ये प्रथमच चेन्नई येथे आंतरराष्ट्रीय पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले. यानंतर त्याने कधीही मागे वळून बघितले नाही. दरम्यान, त्याला प्रशिक्षक किंवा भौतिक सुविधांच्या अभावाचा सामना करत उत्तरोत्तर खेळात स्वत:ला सिध्द केले. महाभारतातील एकलव्याने द्रोणाचार्यकडून प्रशिक्षण न घेताही स्वत:ला धनूर्विद्येत निपूण बनविले, तसाच योगेश्वर हा आधुनिक एकलव्य ठरला. योगेश्वरच्या जीवनात नियतीने अपंगत्व लादून त्याच्यावर नियतीने आघात केला. मात्र, मेहनत व जिद्दीच्या जोरावर त्याने अपंगत्वावर मात करून कर्तृत्वाने नाव कमविल्याने 'कोन कहता है आसमान में सुराग नहीं होता! एक पत्थर तो तबीयत से उछाला यारो!! असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.१६ स्पर्धेत मिळविले ३२ पदकखेळात रूची असतानाही केवळ अपंगत्वामुळे त्याला खेळात अडचणी निर्माण होत होत्या. अशा योगेश्वरने जिद्दीच्या बळावर १६ पॅरा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा खेळून ३२ पदक जिंकले. यात १२ सुवर्ण, १३ रौप्य व ७ कास्य पदकांचा समावेश आहे. चार आंतरराष्ट्रीय, तीन राष्ट्रीय व नऊ राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने प्रतिनिधीत्व केले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चेन्नई (२००७), चंदीगड (२०१०), बंगलोर (२०१३) व गाझीयाबाद (२०१५) येथे त्याने भारताचे प्रतिनिधीत्व केले. बंगलोर येथील स्पर्धेत त्याने भारतासाठी पहिले पदक जिंकून देत पदकांची सुरूवात करून दिली, हे विशेष.आंतरराष्ट्रीय खेळाडूची उपेक्षाखेळात पदक जिंकून देणाऱ्या या खेळाडूला साधे प्रशिक्षक तर सोडाच साहित्य, भौतीक सुविधाही देण्यात सरकारने पुढाकार घेवू नये, एवढा दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे. उच्च शिक्षित योगेश्वर नोकरी व पुरस्कारासाठी शासनाचे उंबरठे झिजवीत आहे. मात्र, शासनाने त्याची साधी दखल घेतलेली नाही. आंतरराष्ट्रीय क्षितीजावर नाव कोरलेल्या योगेश्वरला स्थानिक प्रशासनाकडूनही दुर्लक्षीत करण्यात येत आहे. जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी तीन वेळेस कागदपत्र सादर केलीत परंतू त्याला डावलण्यात आले. एमएड प्रवेशाच्या वेळेस खेळाडूच्या राखीव जागेवर त्याला डावलून सुदृढ महिलेला घेण्यात आले.