बंदचा फटका : वधू-वरांकडील मंडळींची गैरसोय, सराफा दुकाने १४ दिवसांपासून बंदचराहुल भुतांगे तुमसर‘एक्साईज ड्युटी’ला घेऊन मागील १४ दिवसांपासून सुरू असलेल्या सराफा व्यवसायिकांच्या बेमुदत बंदमुळे वधू-वरांकडील मंडळीची गैरसोय होत आहे. वेळेवर दागिने मिळू न शकल्याने अनेकांनी जुन्याच दागिन्यांवर लग्न सोहळे साजरे करण्यावर भर दिला आहे. लग्न ठरलेल्या वधू-वरांच्या पालकांचे तोंडचे पाणी पळाले आहे.केंद्रीय अर्थ संकल्पात सोन्यावर एक टक्का आबकारी कर लागू करण्यात आला आहे तसेच खरेदीदारांना पॅन कॉर्डची सक्ती करण्यात आल्याच्या विरोधात संपूर्ण भारतातील सराफा व्यवसायीकांनी १ मार्चपासून देशव्यापी बेमुदत बंद पुकारला आहे. यामध्ये तुमसर, मोहाडी सराफा संघही झाले आहेत. त्यामुळे झाडून सगळया सराफा दुकाने कुलूप बंद आहेत. थोडक्यात सराफा बाजारावर अवकळा पाहावयास मिळते आहे. तब्बल चौदा दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे. त्यात आतापर्यंत सराफा व्यवसायीकांनी विविध मार्गाने कधी बाजारात फळे विकून तरी कधी गरम समोसे व चहा विकून सरकारचा निषेध नोंदविला. सुरवातीला सराफा व्यवसायकांनी दुकाने बंद ठेवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने अबकारी कर मागे घेण्याची विनंती केली. मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याने बेमुदत बंद केव्हा संपणार हे सांगणे कठिण झाले आहे. याचा सर्वाधिक फटका मात्र नववर वधूस बसत आहे.मे महिन्यात विवाह मुहर्त नसल्याने पालकांनी आपल्या उपवर मुलां-मुलींचे नियोजित विवाह मार्च व एप्रिल महिन्यातील मुहर्तावर ठरविलेले आहे. केंद्रीय अर्थ संकल्पात सोने विक्रीवर एक टक्का आबकारी कर लागू केल्याने सराफा व्यवसायीक बेमुदत बंद करतील याची पुसटशीही कल्पना नसल्याने उपवर वधूचे पालक निश्चित होते. मात्र एक मार्चपासून पुकारलेल्या संपामुळे या पालकांचे तोंडचे पाणी पळाले आहेत. लग्नात सुवर्ण अलंकाराचे कसे हाच प्रश्न आदी विचारात घेतला जात आहे. त्यावर तोडगा म्हणून सासुला आपले सुवर्ण अलंकार सुनेला द्यावे लागत असल्याने लग्न कार्यात पालकांची त्रेधात्रिपिठ उडालेली दिसत आहे. स्वर्ण अलंकाराविना लग्न कार्य कसे करावे, या विवंचनेत ते सापडले आहेत.बंदमुळे १०० कोटींचा फटकामागील १४ दिवसांपासून राज्यभरात व देशात सराफांचे बेमुदत बंद आंदोलन सुरू आहे. तुमसर-मोहाडी तालुक्यातल्या लहान मोठ्या ज्वेलर्सची संख्या विचारात घेता. दररोज किमान ७ ते ८ कोटी रूपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे. त्यानुसार या १४ दिवसात दोन्ही तालुक्यातही १०० कोटी रूपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. याचा परिणाम ईतरही व्यवसायीकावर होत असल्याचे जाणवते.
जुन्याच दागिन्यावर साजरे होतात लग्न सोहळे
By admin | Updated: March 15, 2016 00:50 IST