विद्युत पुरवठा सुरु : १५ नव्या बॅटऱ्या दाखल, दखल लोकमतचीरंजित चिंचखेडे - चुल्हाड (सिहोरा) खरीप हंगाम तोंडावर असताना महत्वाकांक्षी सोंड्याटोला सिंचन प्रकल्पात पाण्याचा उपसा करणारे अनेक उपकरण नादुरुस्त होते. या प्रकल्पाकडे यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचे धक्कादायक वास्तव लोकमतने वृत्त मालीकेमधून जनतेच्या दरबारात मांडले. या नंतर यंत्रणा खडबडून जागी झाली. प्रकल्पात असणाऱ्या समस्या निकाली काढण्यात आलेल्या असून यंदा पाण्याचा उपसा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.सिहोरा परिसरात १४ हजार ९३८ हेक्टर आर शेतीला सिंचीत करण्यासाठी बावनथडी नदीवर महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. हा प्रकल्प साकारण्यासाठी शासनाने ६० कोटी ३१ लक्ष रुपये खर्च केले आहे. यामुळे या प्रकल्पाकडे शेतकरी आशान्वीत आहेत. परंतु गेल्या ३-४ वर्षापासून या प्रकल्पस्थळात ठीक ठाक नाही. अशा चर्चा आहेत. सध्या प्रकल्प स्थळात अस्तव्यस्त आहे. प्रकल्पस्थळातील समस्या निकाली काढताना निधीची अडचण येत असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकल्पस्थळात पाण्याचा उपसा करण्यासाठी नदी पात्रात टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. या टाकीचा गेल्या चार वर्षापासून उपसा करण्यात आलेला नाही. टाकीत नदी पात्रातील गाळ आणि रेतीचा थर आहे. टाकीतील पंपगृहाने पाण्याचा उपसा करताना पंपगृह जाम झाली आहे. ९ पैकी ४ पंपगृहाने पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. यामुळे यंत्रणा किती जागृत आहे याची प्रचिती अनुभवास येत आहे. दरम्यान पंपगृहाला वीज पुरवठा करण्यासाठी ५५ बॅटऱ्या नियोजित आहे. या बॅटऱ्या विद्युत पुरवठ्याने चार्जींेग करण्यात येत आहेत. यापैकी अनेक बॅटऱ्या नादुरुस्त आहेत. यामुळे प्रकल्प पाण्याचा उपसा करणार किंवा नाही असा साशंक प्रश्न शेतकऱ्यात निर्माण झालेला आहे. कवलेवाडा येथून विद्युत प्रवाह सुरु असताना प्रकल्पस्थळात अंधार असताना यंत्रणा दुर्लक्षित असल्याचे दिसून आले आहे. यामुळे पावसाळा आणि खरीप हंगाम तोंडावर असतानाही यंत्रणा जागृत असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात लोकमतने वृत मालीका प्रकाशित करीत शासनाचे लक्ष वेधले आहे. या वृत्ताची दखल घेत यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पंपगृहांना विद्युत पुरवठा करणाऱ्या नादुरुस्त बॅटऱ्या हटविण्यात आलेल्या आहेत. या प्रकल्पस्थळात नव्या १५ बॅटऱ्या प्राप्त झालेल्या आहेत. यामुळे प्रकल्पस्थळात खंडीत असलेला वीज पुरवठा पुन्हा सुरु करण्यात आलेला आहे. या प्रकल्पस्थळात ऐरवेशनची प्रमुख समस्या आहे. पाण्याचा उपसा करीत असताना येरवेरात टंकर बंद ठेवणे धोक्याचे असल्याचे सांगण्यात येत आहे. ही समस्या तातडीने निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.दरम्यान प्रकल्पस्थळात प्रवेश नाकारण्यासाठी प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदा प्रकल्पस्थळात असलेली समस्या तातडीने निकाली काढण्यात आल्याने नदी पात्रातील पाण्याचा उपसा विस्तीर्ण चांदपूर जलाशयात होणार आहे. परंतु बावनथडी नदीचे पात्र दगाबाज ठरत आहे. या नदीचे पात्र सध्यातरी कोरडे आहे. महत्वाकांक्षी प्रकल्प पाण्याचा उपसा करण्यासाठी सज्ज असताना नदी पात्रात पाणी नाही. या प्रकल्पाला राजीव सागर (बावनथडी प्रकल्प)चे पाणी सोडण्याची ओरड आता शेतकरी करीत आहेत.शेतकऱ्यांनी खरीप हंगाम लक्षात घेता धानाची पेरणी केली आहे. परंतु शेत शिवारात पाणी नसल्याने शेतकऱ्यांची धाकधुकी वाढली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या कोमेजल्या असल्याने चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्यासाठी नियोजन करण्याची बोंबाबोंब गावात ऐकायला येत आहे.
सोंड्याटोला सिंचन प्रकल्पात पाण्याचा उपसा होणार
By admin | Updated: June 26, 2014 23:04 IST