शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

झाडाच्या बुंध्याशी लागले पाणी!

By admin | Updated: May 12, 2014 23:16 IST

एकीकडे जिवाची काहिली करणारा उन्हाळा. दुसरीकडे पाणी टंचाई. अशा स्थितीत अंगाची लाहीलाही करीत पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ असताना साकोली तालुक्यातील

संजय साठवणे - साकोली

एकीकडे जिवाची काहिली करणारा उन्हाळा. दुसरीकडे पाणी टंचाई. अशा स्थितीत अंगाची लाहीलाही करीत पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ असताना साकोली तालुक्यातील आलेबेदर जंगलातील गडबड्या महादेव टेकडीच्या खाली एका झाडाच्या बुंध्याशी अवघ्या एक फुटावर पाणी लागले आहे.

मे महिन्याच्या ऊन्हात सुर्य आग ओकत आहे. नाले, तलाव व विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत. असे असताना जमिनीपासून अवघ्या एक फुट खोल खड्यात पाणी लागणे, ही निसर्गाची लिला म्हणायची की वैज्ञानिक कारणामुळे पाणी येत असावे, हा संशोधनाचा भाग आहे. आलेबेदर जंगलातील तुडमापुरी या गावातील नागरिकांना महादेवाच्या टेकडीखाली तुडमापुरीकडे जाणार्‍या पायवाटेच्या बाजुला एका झाडाच्या बुंध्याशी असलेल्या एका खड्ड्यात पाणी दिसून आले. हा खड्डा केवळ दीड बाय दीड लांबी रुंदीचा असून एक फूट खोल खड्डा आहे. या खड्डयातील पाणी बघून गावकरी चकीत झाले.

महादेवाची आख्यायिका

या जंगलातील टेकडीवर भगवान शंकराचे एक छोटेसे मंदिर आहे. दरवर्षी याठिकाणी महाशिवरात्रीला यात्रा भरते. हे मंदिर गडबड्या महादेवाचे मंदिर असे नावारुपाला आहे. नवसाला पावनारा महादेव असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणने आहे.

झर्‍याविषयी माहिती

ज्याठिकाणी हे पाणी लागले, त्याठिकाणाहून एक लहानसा पाणी जाण्याचा मार्ग पाट आहे. या पाटातून पावसाळ्यात पाणी वाहते. मात्र हिवाळा व उन्हाळ्यात हा पाट पुर्णत: कोरडा राहतो. ज्याठिकाणी हे पाणी लागले त्याठिकाणी ४0 ते ५0 वर्षापुर्वी झरा होता. कालांतराने तो झरा आटला. आता बर्‍याच वर्षानंतर याठिकाणी पाणी लागले आहे.

वन्यप्राण्याचे वास्तव्य

ज्याठिकाणी हे पाणी लागले त्याठिकाणी वाघ व अस्वल यासारखे वन्यप्राणी राहत आहेत. वन्यप्राण्यांनी पाण्याच्या शोधात खड्डा केला असावा, पूर्वी असलेला झरा पुन्हा सुरू झाला असावा, असेही नागरिकांचे म्हणने आहे. भर उन्हाळ्यात एक फुटावर पाणी लागल्यामुळे या मंदिराला भेट देणार्‍या भाविकांची संख्या वाढली आहे.