शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
2
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
3
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
4
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
5
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
6
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
7
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
8
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
9
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
10
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
11
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
12
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
13
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
14
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
15
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
16
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
17
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
18
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
19
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
20
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
Daily Top 2Weekly Top 5

मधूर वाणी, प्रेमाच्या बळावर इंदूर स्वच्छतेत देशात नं. १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 21:37 IST

मध्यप्रदेशची व्यावसायिक राजधानी असलेल्या इंदूर शहराने इतिहासात सुवर्ण अक्षराने आपले नाव कोरले. देशातील सर्वात सुंदर, स्वच्छ शहराचा मान सलग दोन वर्ष या शहराने पटकावला. मधुर वाणी आणि प्रेमाच्या बळावर तब्बल ३२ लाख नागरिकांची मने जिंकण्याचे काम ‘इंदूर नगर निगम’म्हणजेच महापालिकेने केले.

ठळक मुद्देअफाट इच्छाशक्ती : ३२ लाख नागरिकांचे पाठबळ मिळविले

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मध्यप्रदेशची व्यावसायिक राजधानी असलेल्या इंदूर शहराने इतिहासात सुवर्ण अक्षराने आपले नाव कोरले. देशातील सर्वात सुंदर, स्वच्छ शहराचा मान सलग दोन वर्ष या शहराने पटकावला. मधुर वाणी आणि प्रेमाच्या बळावर तब्बल ३२ लाख नागरिकांची मने जिंकण्याचे काम ‘इंदूर नगर निगम’म्हणजेच महापालिकेने केले.मागील काही वर्षांमध्ये हे शहर अतिशय गलिच्छ होते. शहरात आलेल्या पाहुण्यांना एक दिवसही थांबावे वाटत नव्हते. महापालिकेला भ्रष्टाचाराची वाळवी लागली होती. तिजोरीवर अक्षरश: दरोडे पडत होते. इतर शहरांप्रमाणेच नागरिकांचा तेथील महापालिकेवरील विश्वास उडाला होता. केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत मिशन’या योजनेच्या पहिल्याच वर्षी इंदूरचा देशभरात १४९ वा क्रमांक आला होता. याला महापालिकाच जबाबदार होती. अशा दयनीय अवस्थेत मध्यप्रदेश शासनाने १९९७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले मनीष सिंह यांची ३० मे २०१५ रोजी इंदूर महापालिका आयुक्त म्हणून नेमणूक केली. त्यांच्या नियुक्तीपूर्वीच आमदार मालिनी गौड जनतेतून महापौर म्हणून निवडून आल्या होत्या. महापालिकेत रुजू होताच आयुक्त मनीष सिंह यांनी महापौरांची परवानगी घेऊन शहर स्वच्छ, सुंदर आणि देशात प्रथम क्रमांकावर आणण्याची इच्छा व्यक्त केली.महापौरांनीही परवानगी दिली. राजकीय हस्तक्षेप अजिबात चालणार नाही, असेही आयुक्तांनी ठणकावून सांगितले. इंदूरला देशात प्रथम क्रमांक मिळवून द्यायचा असेल तर त्रिसूत्रीवर काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिले म्हणजे शहर कचराकुंडीमुक्त करणे, दुसरे सर्वच रस्त्यांवर असलेल्या धूळ-कणांना हद्दपार करणे आणि तिसरे प्रत्येक घरातून कचरा जमा करणे. या अवघड कामाचा धनुष्य त्यांनी पेलला.एकेकाळी अस्वच्छ शहरात गणती होणाऱ्या मध्यप्रदेशातील इंदौर शहराने सक्षम अधिकारी, कठोर निर्णय, लोकजागृती आणि राज्य सरकारचे पाठबळ या जोरावर देशातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर शहर होण्याचा मान मिळविला आहे. औरंगाबादमध्ये मागील पाच महिन्यांहून अधिक काळ कचराकोंडीची समस्या निर्माण झाली आहे. भंडारा येथेही नागरिकांना कचरा व अशाच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाची चमू थेट इंदूर शहरात दाखल झाली. महापौर, अधिकारी आणि नागरिकांच्या भेटी घेतल्या. इंदूर शहराने स्वच्छतेची किमया केली कशी? हे लोकमत प्रतिनिधींनी जाणून घेतले. इंदूर चकाचक झाले मग भंडारा का होऊ शकत नाही. इंदूरच्या स्वच्छता कार्याविषयीची मालिका आजपासून देत आहोत.दोन वॉर्डांमध्ये पायलट प्रकल्पशहरातील दोन वॉर्ड पायलट प्रकल्प म्हणून निवडण्यात आले. या वॉर्डातील कचराकुंड्या गायब करण्यात आल्या. शंभर टक्के डोअर- टू- डोअर कचरा कलेक्शनवर भर देण्यात आला. हा प्रकल्प राबवीत असताना नागरिकांची मानसिकता, क्षणाक्षणाला येणाऱ्या अडचणींचा आयुक्त स्वत: अत्यंत बारकाईने अभ्यास करीत होते. जागेवरच या अडचणी सोडविण्यावर त्यांचा सर्वाधिक कल होता. नगरसेवक, सामाजिक संघटना, शालेय विद्यार्थी यांच्या मदतीने दोन्ही वॉर्ड कचरामुक्त करण्यात आले. या दोन वॉर्डाने संपूर्ण महापालिकेला शहर स्वच्छ होईल, असा विश्वास दिला.‘कभी महक की तरह हम गुलों से उड़ते हैं,कभी धुएं की तरह पर्वतों से उड़ते हैंये केचियाँ हमें उड़ने से खाक रोकेंगी,की हम परों से नहीं हौसलों से उड़ते हैं’हा राहत इंदौरी यांचा शेर डोळ्यासमोर ठेवून महापालिकेने अखेर गगनभरारी घेण्याचा निर्णय घेतला.भ्रष्ट कंपनीची हकालपट्टीआयुक्त मनीष सिंह यांनी शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला. या यंत्रणेतील भ्रष्टाचाऱ्यांना टार्गेट केले. शहरातील कचरा जमा करणाऱ्या ‘ए-टू-झेड’कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात आले.कंपनी वाहनांमध्ये माती-कचरा भरून दररोज ७००-८०० मेट्रिक टन कचरा उचलल्याचा दावा करीत होती. कंपनीसोबत हातमिळवणी करणाºया अधिकाऱ्यांनाही कर्तव्याची जाणीव करून देण्यात आली. आयुक्त स्वत: सकाळी ६ ते रात्री २ वाजेपर्यंत रस्त्यांवर फिरून काम करू लागले. त्यामुळे कुंभकर्णी झोपेत असलेली संपूर्णयंत्रणा खडबडून जागी झाली.