शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

थकीत कृषी वीज बिलाच्या वसुलीकरिता शेतकऱ्यांना विविध सवलती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:06 IST

गत चार पाच वर्षांपासून महावितरणने कृषी वीज बिलाकडे दुर्लक्ष केले होते. अनाठाई वारेमाप वीज बिल पाठवत असल्याने बळीजाने ...

गत चार पाच वर्षांपासून महावितरणने कृषी वीज बिलाकडे दुर्लक्ष केले होते. अनाठाई वारेमाप वीज बिल पाठवत असल्याने बळीजाने बिल भरण्याचे टाळले. त्यामुळे थकीत वीज बिलाचे प्रमाण आपोआपच वाढत गेले. थकीत वीज बिलाची पालांदूर केंद्रांतर्गत थकीत शेतकरी १७११ ची रक्कम ६.३७ कोटी एवढी वाढलेली आहे. या रकमेची वसुली व्हावी याकरिता कृषी विभागाने वीज बिलात माहे सप्टेंबर २०२० च्या बिलातील ५० टक्के मूळ थकबाकी भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकी माफ करण्याचे जाहीर केले आहे. तसेच माहे सप्टेंबर २०२० पर्यंतचा विलंब आकार पूर्णपणे अर्थात १०० टक्के माफ, माहे सप्टेंबर २०१५ पूर्वी पर्यंत थकीत बाकीवरील व्याज पूर्णपणे माफ, सप्टेंबर २०१५ नंतरच्या थकबाकीवरील व्याज १८ टक्के न आकारता वीज आयोगाने मान्यता दिलेल्या दराने आकारणीचे नियोजन; परंतु वीज बिलात सवलत मिळविण्याकरिता चालू वीज बिल भरणे बंधनकारक राहील. तसेच या योजनेंतर्गत रोहित्र अर्थात डीपी स्तरावर सर्व कृषी ग्राहकांनी १०० टक्के चालू वीज बिल व थकबाकी भरल्यास कृषी पंपाच्या चालू वीज बिलावर शेतकऱ्यांना १० टक्के सवलत देण्यात येईल, असे शेतकरी बैठकीत सांगण्यात आले.

बैठकीला कार्यकारी अभियंता कुमार, अभियंता टेकाम, उपकार्यकारी अभियंता राजन लिमजे, तंत्रज्ञ हिरामण बारई, उपसरपंच हेमराज कापसे, पोलीस पाटील रमेश कापसे तथा शेतकरी बांधव उपस्थित होते.

चौकट डब्बा

शेतकऱ्यांना मागणीनुसार तत्परतेने नवीन वीज कंनेक्शन पुरविण्याचे वेळापत्रक तयार करण्यात आलेले आहे. ३० मीटरपर्यंतचे अंतरावर शेतकऱ्याला ३० दिवसांच्या आत सर्व्हिस केबलने कनेक्शन मिळेल. २०० मीटरपर्यंत त्यानंतर आला तीन महिन्यात एबी केबलद्वारे कनेक्शन देण्यात येईल. ६०० मीटरपर्यंतचे अंतराला प्रतीक्षा यादीप्रमाणे एचव्हीडीएसद्वारे कनेक्शन पुरविण्यात येईल. त्याचप्रमाणे ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असल्यास सौर ऊर्जेवरील सेवा शेतकऱ्यांना पुरवित सौर ऊर्जेचे कनेक्शन देण्यात येईल.

उत्पन्न वाढीकरिता ग्रामपंचायतला संधी

महाराष्ट्र शासनाच्या नवीन धोरणानुसार ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्याकरिता महावितरणच्या वीज बिल वसुलीचा आधार घेतले जाणार आहे. ग्रामपंचायतने शेतकऱ्याचे कृषी वीज बिल कार्यालयात जमा केल्यास प्रति बिलाला ५ रुपयांचा कमिशन ग्रामपंचायतला मिळेल. तसेच शेतकऱ्याकडून थकीत वीज बिलाची वसुली केल्यास थकीत वीज बिलाच्या २० टक्के रक्कम ग्रामपंचायतला मिळेल. यातून निश्चितच ग्रामपंचायतच्या उत्पन्नात भर पडून गाव विकासाकरिता नवी संधी शासनाच्या वतीने महावितरणच्या माध्यमातून राबविलेली आहे.