शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ब्लिचिंग पावडरचा वापर कागदोपत्री

By admin | Updated: August 11, 2014 23:44 IST

पावसाळा सुरू होवून दोन महिने लोटले असताना ग्रामीण भागात पाणी शुद्ध करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन जागरूक नसल्याचे भयावह चित्र पहावयास मिळत आहे.

भंडारा : पावसाळा सुरू होवून दोन महिने लोटले असताना ग्रामीण भागात पाणी शुद्ध करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन जागरूक नसल्याचे भयावह चित्र पहावयास मिळत आहे. ग्रामपंचायत स्तरावर ब्लिचिंग पावडर खरेदी करून वापराने निर्देश असताना जिल्ह्यातील सातही तालुक्यात ब्लिचिंग पावडरचा वापर कागदोपत्रीच दिसत असून निधी लाटण्याचा प्रयत्नासह नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे तर काही ग्रामपंचायती याला अपवाद असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात ८७५ गावे असून ५६५ पेक्षा जास्त ग्रामपंचयती आहेत. ग्रामपंचायतीमध्ये शासनाची पाणीपुरवठा योजना सुरू आहे. यातील पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली कार्यान्वित आहेत. मात्र पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागातील विहिरी, पाणवठ्यांमध्ये नवीन पाणी आले आहे. हे पाणी शुद्ध करणे गरजेचे आहे. या पाण्यातून जंतू संसर्ग होवून साथीचे रोग पसरण्याची भिती असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. विहिरी व इतर पाण्याच्या स्त्रोतामध्ये ब्लिचिंग पावडर टाकल्या जात नसल्याने अनेक गावांमध्ये नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत आहे. ब्लिचिंगमुळे पाण्याची चव बदलते, अन्न लवकर शिजत नसल्याच्या भ्रामक कल्पनाही खेड्यांमध्ये पसरविल्या जात असून त्यामध्ये तथ्य नसल्याचे सांगणे, जरूरीचे वाटते. योग्य प्रमाणात ब्लिचिंगचा वापर केल्यास पाणी शुद्ध होऊन पिण्यास योग्य होते. मात्र सध्या ब्लिचिंग पावडरचा वापर कागदोपत्रीच दिसत असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)