राजेंद्र पटले यांनी घेतली भेट : शिवसेनेच्यावतीने निवेदनतुमसर : मुंबई -हावडा रेल्वे मार्गावर माडगी शिवारात वैनगंगा नदीवर ब्रिटीशकालीन १०५ वर्षे जुना पुल आहे. अविरत सेवा देणारा या पुलाची सद्यस्थिती काय आहे? त्याची नियमित तपासणी होते काय? तांत्रिक तपासणी केव्हा करण्यात आली, अशा प्रश्नांची उत्तरे रेल्वे प्रशासनाने जनतेला द्यावी या आशयाचे निवेदन जिल्हा शिवसेना प्रमुखांनी विभागीय अभियंत्यांना दिले.महाड येथे ब्रिटीशकालीन पुल वाहून गेल्याने जुन्या ब्रिटीशकालीन पुलांची स्थिती काय आहे? या संदर्भात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्या सोबत शिष्टमंडळाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय अभियंता यांची कार्यालयात भेट घेऊन निवेदन व चर्चा केली.वैनगंगा नदीवर माडगी शिवारात ब्रिटीशांनी मुंबई - हावडा रेल्वे मार्गावर दगडी पुल तयार केला होता. या पुलाला १०५ वर्षे झाली आहेत. या मार्गावर २४ तासात सुमारे २०० मालवाहतूक व प्रवासी रेल्वेगाड्या धावतात. या पुलाची सद्यस्थिती व मजबुती संदर्भात रेल्वे प्रशासनाने काय केले? नवीन पुल बांधण्याचे शासनाचे विचाराधीन आहे काय? तांत्रिक पुलाची तपासणी केव्हा करण्यात आली? याची माहिती सादर करण्याची मागणी शिवसेना प्रमुख राजेंद्र पटले यांनी केली. शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले, शहर प्रमुख कमलाकर निखाडे, अमित मेश्राम, मनोज चौबे यांचा समावेश होता. (तालुका प्रतिनिधी)
ब्रिटीशकालीन रेल्वे पुलाची तांत्रिक तपासणी करा
By admin | Updated: August 10, 2016 00:21 IST