मोहाडी : नर्मदा ठवकर कनिष्ठ महाविद्यालय अंतर्गत वायसीएम अभ्यासक्रम सुरू असून ज्या विद्यार्थ्यांनी केंद्र संयोजक सतीश डोकरीमारेकडे चालान भरण्याचे पैसे जमा केले असतील त्या सर्व विद्यार्थ्यांनी लिखित स्वरूपात तक्रार अर्ज दाखल करावे, विद्यालय १० जूनपासून सुरू होत आहे, असे आवाहन संस्था संचालक सुरेश ठवकर यांनी पत्रपरिषदेद्वारे केले आहे.यावर्षीपासून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठ अंतर्गत आॅनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात आली तसेच काही विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज अपलोडसुद्धा करण्यात आले. विद्यार्थ्यांनी चालान स्वत: भरायचे होते मात्र काही विद्यार्थ्यांनी चालान भरण्यासाठी सतीश डोकरीमारे याचेकडे पैसे जमा केले असे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी तक्रार अर्ज महाविद्यालयात दिल्यास कोणासोबत किती आर्थिक व्यवहार झाला आहे किंवा नाही याची शहानिशा करून संबंधितावर त्या तक्रार अर्जाच्या आधारे फिर्याद दाखल करता येईल, तसे विद्यार्थ्यांनी चालान स्वत:च भरायची होती मात्र त्यांनी संयोजक डोकरीमारे याच्यावर विश्वास ठेवून परस्पर व्यवहार केला. या व्यवहाराबाबद संस्था संचालकांना अंधारात ठेवण्यात आले.सतीश डोकरीमारे यांनी वायसीएम संयोजक या नात्याने परीक्षेची संपूर्ण जबाबदाीर पार पाडने आवश्यक असताना त्यांनी आपल्या कार्यात हयगय केली. त्यामुळे ते दोषी आहेत यासाठी विद्यार्थ्यांनी तक्रार अर्ज लेखी स्वरूपात महाविद्यालय द्यावे. विद्यार्थ्याचे बाजूने संस्थाचालक व महाविद्यालय असून विद्यापिठात तसे प्रयत्न सुरू असल्याचे संस्था संचालक सुरेश ठवकर यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली आहे. (शहर प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनी तक्रार अर्ज दाखल करावे
By admin | Updated: May 21, 2016 00:40 IST