प्रकरण आक्षेपार्ह छायाचित्रांचे : आमदारांसह कार्यकर्त्यांना दोनदा अटकभंडारा : छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुख बाळासोहब ठाकरे यांचे आक्षेपार्ह छायाचित्र फेसबुकवर टाकण्यात आल्यानंतर भंडाऱ्यात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी शिवसेनेने भंडारा बंदचे आवाहन केले होते. दरम्यान, शिवसैनिकांनी रॅली काढून घटनेचा निषेध नोंदविला. याप्रकरणी आ.नरेंद्र भोंडेकर व शिवसैनिकांना दोनदा अटक करण्यात आली.याघटनेप्रकरणी अड्याळमध्ये बंद पाळून निषेध नोंदविण्यात आला. फेसबुकवर आक्षेपार्ह छायाचित्र टाकल्याची माहिती शहरात पसरताच शहरातील शिवसैनिक पोलीस ठाण्यात एकत्र झाले. शिवसैनिकांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन भंडारा शहर पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर संतप्त शिवसैनिकांनी रात्रीच भंडारा - वरठी मार्गावरील वाहतूक रोखून धरली. या घटनेच्या निषेधार्थ बंदचे आवाहन करीत असताना आ.नरेंद्र भोंडेकर, जिल्हाप्रमुख राधेश्याम गाढवे, उपजिल्हाप्रमुख प्रशांत लांजेवार, सतीश तुरकर, पलाश शांडिल्य, तालुका प्रमुख हेमंत बांडेबुचे, बबलू आतीलकर, दिनेश गजबे, आतिश बागडे आदी शिवसैनिकांना अटक करण्यात आली त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. जिल्ह्यातील वातावरण सध्या शांत आहे. (शहर प्रतिनिधी)
शिवसेनेच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Updated: July 24, 2014 23:43 IST