शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खंडित वीज पुरवठा समस्या कायमस्वरुपी सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 21:39 IST

तालुक्यातील महत्वाचे ठिकाण असलेल्या पालांदूर/चौरास क्षेत्रातील ४० ते ४५ गावांना विजपुरवठा करणाऱ्या येथील ३३ केव्ही उपकेंद्राला विविध समस्यांमुळे 'ब्रेकडाऊन'चा फटका सहन करावा लागतो.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांना निवेदन : पालांदूर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मागणी, ३३ केव्ही उपकेंद्रात नवीन वाहिणी जोडण्याची गरज
<p>लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यातील महत्वाचे ठिकाण असलेल्या पालांदूर/चौरास क्षेत्रातील ४० ते ४५ गावांना विजपुरवठा करणाऱ्या येथील ३३ केव्ही उपकेंद्राला विविध समस्यांमुळे 'ब्रेकडाऊन'चा फटका सहन करावा लागतो. येथील उपकेंद्राला सानगडी पालांदूर किंवा पोहारा-पालांदूर मार्गाने दुहेरी पुरवठा करण्यात यावे, उपकेंद्रासाठी नवीन वाहिणी टाकून पालांदूर क्षेत्रातील खंडीत विज पुरवठा समस्या कायम स्वरुपी सोडविण्यात यावी, अशी मागणी पालांदूरचे सरपंच जितेंद्र कुरेकर, उपसरपंच हेमराज कापसे पदाधिकाºयांनी गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरकर यांच्यासह वरिष्ठांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.पालांदूर येथील ३३ केव्ही उपकेद्राला स्थानिक व परिसरातील सरासरी ३,२०० कृषीपंप, ८ ते ९ हजार घरगुती, आयपी, दिवाबत्ती, नळयोजना तथा अन्य वीजजोडणी आहे. कृषी संजीवनी योजनेअंतर्गत सरासरी ७०० पेक्षा अधिक कृषीपंप धारकांनी योजनेचा लाभ घेऊन अन्य कृषीपंपधारक व ग्रामपंचायत अंतर्गत आणि अन्य नळ योजनेतील वीज देयक भरण्यामध्ये सर्वाधिक टक्केवारी आहे. घरगुती व उद्योगधंदे वीज ग्राहकांचे वीज देयके भरण्याची प्रक्रीया नियमित आहेत. मात्र येथील उपकेंद्राला मौजा आसगाव येथील १३२ केव्हीवरुन विजपुरवठा केला आहे. या सिंगल वाहिणी विजपुरवठा दरम्यान पालांदूर ते आसगाव हे अंतर २८ किमी एवढे आहे. वादळी पावसात, अवकाळी वादळात आणि अन्य समस्यांमुळे 'इन्सूलेटर' नादुरुस्त होऊन नेहमीच तांत्रिक बिघाड होत असतो. अशावेळी पालांदूर क्षेत्रातील ४० ते ४५ गावांचा विजपुरवठा खंडीत झाल्याने २५ ते ३० हजार लोकांना व विजग्राहकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून आर्थिक नुकसानीचा भुर्दंड सोसावा लागतो. रात्री-बेरात्री वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे रात्रभर नागरिकांना जागरण करावे लागते. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होत असून ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे. विविध समस्या लोकांना होऊ नये म्हणून येथील संबंधित कर्मचाºयांना आसगाववरुन येणाºया ३३ केव्ही वाहिणीला 'बे्रक डाऊन' शोधण्यासाठी तथा लाईन वरील पेट्रोलिंग करुन कारण सापडत नाही. त्यासाठी अनेकदा दोन ते तीन दिवसाचा अवधी लागतो. त्यामुळे गृह उद्योग, कृषीपंपधारक, शासकीय - निमशासकीय कार्यालय, बँका, शाळा- महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालय, मंडळ कृषी कार्यालय, तलाठी कार्यालय यांचे दैनंदिन कामकाजात मोठ्या अडचणी निर्माण होत ओहत.बारव्हा, सानगडी, लाखनी पिंपळगाव, अड्याळ, कोंढा, शिवणी-मोगरा या गावात दुहेरी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र पालांदूर/चौ. येथील विद्युत केंद्राला अजूनपर्यत 'डबल सप्लाय'ची व्यवस्था करण्यात आलेली नाही. या संपूर्ण बाबींचा अवलोकण करुन पालांदूर व परिसरातील जनतेच्या खंडीत वीजपुरवठा समस्या कायम स्वरुपी सोडविण्यात यावे, अशा मागणीचा ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी मासिक सभेत ठराव घेतला. पुढाकाराने मुख्य अभियंता गोंदिया परिमंडळ सुखदेव शेरकर यांचेसह, उर्जामंत्री तथा पालकमंत्री, खासदार मधूकर कुकडे आणि वरिष्ठ अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात सरपंच जितेंद्र कुरेकर, दिलीप बडोले, सदस्य भरत घरडे, तुकडू खंडाईत, कोटीराम भूसारी, दिपक ठाकरे, लिपीक राधेश्याम पाथरे उपस्थित होते.