शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
3
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
4
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
5
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
6
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
7
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
8
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
9
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
10
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
11
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
12
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
13
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
14
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
15
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
16
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
17
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
18
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
19
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
20
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 

वाघाच्या शिकारीचे संकेत

By admin | Updated: March 10, 2015 00:57 IST

दोन तीन वर्षापूर्वी विदर्भातील सर्व व्याघ्र प्रकल्प व अभयारण्यात वाघांच्या शिकारी रोखण्याकरिता

पवनी : दोन तीन वर्षापूर्वी विदर्भातील सर्व व्याघ्र प्रकल्प व अभयारण्यात वाघांच्या शिकारी रोखण्याकरिता हाईअलर्ट होता. कडक सुरक्षा व्यवस्था असताना फारसे चर्चेत नसणाऱ्या पवनी वनपरिक्षेत्रात बहेलिया टोळीने वायगावच्या जंगलात एका पट्टेदार वाघाची शिकार केल्याचे संकेत मिळाल्यामुळे सीबीआयची चमू चौकशीसाठी दोन दिवसापूर्वी येथे येऊन गेली.दोन तीन वर्षापूर्वी पवनी वनपरिक्षेत्र अखंड होते. कोरंभी, पाहुणगाव, चिचखेडा, रानाळा येथील वनपरिक्षेत्राचा समावेश उमरेड करांडला अभयारण्यात झालेला नव्हता. येथील जंगल घनदाट, विस्तीर्ण असल्यामुळे येथे वाघ, बिबट व इतर वन्य प्राण्यांची संख्या वाढत होती. येथील जंगलाच्या सीमा ताडोबा, अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील जंगलाला लागून असल्यामुळे तेथील व येथील वाघांचे जाणे येणे नेहमी सुरु असते. त्यामुळे ही वाघांच्या संख्येत वाढ झाली.दोन तीन वर्षापासून वाघांच्या शिकारीकरिता प्रसिद्ध असणाऱ्या बहेलीया टोळीच्या नजरा विदर्भाच्या वाघांवर असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात मेळघाट, ताडोबा, अंधारी, नागझिरा आदी व्याघ्र प्र्रकल्प व अभयारण्यात हाय अलर्ट लागू करून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. येथेच बहेलीया टोळ्यांचे फावले. वाघांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या व्याघ्र प्रकल्प व अभयारण्यात कडक सुरक्षा असल्यामुळे या शिकारी टोळ्यांनी फारशी सुरक्षा नसलेल्या व प्रसिद्धीच्या दूर, फारशी चर्चा नसलेल्या भंडारा जिल्ह्यातील जंगलात आपला मोर्चा वळविला व ते आपल्या उद्देशात यशस्वी ठरले.सीबीआय व मेळघाट वाईल्ड लाईफ क्राईम सेलच्या संयुक्त पथकाने कार्यवाही करून वाघाच्या हत्येप्रकरणी बहेलीया टोळीचा म्होरक्या कुट्टू छेलाल पारधी (३०) याला मध्यप्रदेशातील कटनी जिल्ह्यातून अटक केली आहे. त्याने भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रपती वाघासह काही वाघांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्यामध्ये पवनी तालुक्यातील वायगाव जवळील जंगलात एका पट्टेदार वाघाची हत्या केल्याचे संकेत मिळाल्यामुळे दोन दिवसापूर्वी सीबीआय पथक वनअधिकाऱ्यांसह चौकशीकरिता येथे येवून गेले. परतीच्या वेळेस सिंदपुरी टी पॉईट जवळ भटक्या जमातीचा असलेल्या झोपडीवासीयांनाही काही माहिती विचारल्याचे समजते. दोन तीन वर्षापूर्वीच पवनीच्या जवळील ब्रम्हपुरी व नागभिड पर्यंत बहेलीया टोळ्यांचे नेटवर्क आढळून आले होते. तरी वनविभाग गाफील होता. वेळीच अलर्ट होण्याची गरज होती. (शहर प्रतिनिधी)

 

‘लोकमत’ने केले होते अलर्ट४वाघांच्या हत्येकरिता दोन वर्षापूर्वी बहेलीया टोळ्या विदर्भात दाखल झाले होते. व्याघ्र प्रकल्प व अभयारण्यात रेड अलर्टनंतर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पूर्व विदर्भात यापूर्वीच बहेलीया टोळ्यांचे नेटवर्कचे अस्तित्व आढळून आल्यामुळे येथेही अलर्ट राहण्याची गरज होती. सगळीकडे सुरक्षा व्यवस्था असल्यामुळे बहेलीया टोळ्या आपला मोर्चा फारसा प्रसिद्ध नसलेल्या जंगलात वळणावर असून या टोळीच्या नजरा पवनी वनपरिक्षेत्रातील वाघावर असल्याबाबत पट्टेदार वाघांवर बहेलिया टोळीची नजर या शिर्षकाखाली २७ मे २०१२ च्या लोकमत मध्ये प्रकाशित केली होती. पण याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे येथे ही शिकाऱ्याने वाघाची शिकार केल्याचे संकेत मिळत. जर येथेही रेड अलर्ट घोषित करून कडक सुरक्षा राखली असती तर ही वेळ आली नसती. या जंगलात कोणाही प्रवेश करून आपले काम करून जावू शकतो.

 

ढोरप परिसरात बिबट्याचा धुमाकूळपवनी : ढोरप येथे बिबट्याचा धुमाकुळ सुरु असून एका वासराला ठार केले तर कन्हाळगाव येथे निलघोडा आला होता. ढोरप, कन्हाळगावच्या आजूबाजूला घनदाट जंगल आहे. त्यामुळे येथे नेहमी गावाजवळ वन्यप्राणी येतात. मागील काही दिवसापासून ढोरप येथे बिबट्याचा धुमाकुळ सुरु आहे. या बिबट्याने रात्रीला गावात येवून एका वासरावर हल्ला करून त्याला ठार केले. या बिबट्याच्या दहशतीमुळे गावकरी रात्री घराबाहेर पडायला घाबरत आहेत. पाण्याच्या शोधात निलघोडा दिवसाढवळ्या कन्हाळगावात आला होता. गावकऱ्यांनी हुसकावून लावताच हा निलघोडा जंगलाच्या दिशेने निघून गेला. येथेच एक अस्वल गावाजवळच्या तलावावर पाणी पिण्यासाठी सायंकाळी अंधार पडण्याच्या वेळेस आले होते. नंतर जंगलाच्या दिशेने निघून गेले. कन्हाळगावाजवळ एक पट्टेदार वाघ ही नेहमी येत असतो. (शहर प्रतिनिधी)नागझिरा वनसंरक्षकांची चार तास जंगल भ्रमंतीशिकार प्रकरणाचा तपास? : तलाव, पाणवठ्यांची पाहणीतुमसर : वाईल्ड लाईफचे तज्ज्ञ तथा नागझिराचे वनसंरक्षक ठवरे यांनी रविवारी नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात स्थानिक वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांसोबत सुमारे चार तास जंगल भ्रमंती केली. यात जंगलातील तलाव, पाणवठे, बावनथडीचा कालवा तथा धरणाची पाहणी केली. वनविभाग येथे नेहमीचीच पाहणी आहे असे सांगत असले तरी वाघांच्या नागझिरा शिकारप्रकरणात व येथील जंगलात साम्य आहे काय? हे या जंगलभ्रमंती रहस्य असल्याचे समजते.नागझिरा अभयारण्यातील राष्ट्रपती सह अन्य वाघांच्या शिकारप्रकरणी म्होरक्या कुटू पारधी (३०) याच्या कबुली जबाबात कोका अभयारण्याजवळील देव्हाडा व तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील पांगळी जंगलाचे नाव कुट्टू पारधी याने घेतले होते. सीबीआयचे पथक तुमसर तालुक्यात येऊन गेले. नागझीराचे वनसंरक्षक ठवरे रविवारी तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात जंगल भ्रमंतीवर आले होते. ठवरे यांनी जंगल तथा गावशेजारील तलाव, जंगलातील पाणवठे, बावनथडी मुख्य कालवा व धरणाची पाहणी केली. उन्हाळा सुरु होण्यापूर्वी वाईल्ड लाईफचे तज्ञ अशी नेहमी पाहणीकरीता येतात हे कारण वनविभाग पुढे करीत आहे.नागझीरा येथील राष्ट्रपती या वाघाची शिकार करण्यात आली. म्होरक्या कुट्टू पारधी याने पांगळी जंगलाचे नाव सांगितले. सीबीआय पथकाने प्रत्येक बिंदूवर पाहणी केली. नागझीरा व नाकाडोंगरी येथील शिकारीचे काही साम्य आहे काय? कुट्टूने पांगळी जंगलाची माहिती का दिली? नागझीरा वाघ शिकार देशात सध्या गाजत आहे. नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात वाघाची शिकारीची अद्याप माहिती नाही. म्होरक्या कुट्टूने सीबीआयला माहिती दिल्यावर भंडारा वनविभाग खळबळून जागा झाला आहे. त्या काळात येथे कोणते वरिष्ठ वनअधिकारी व कर्मचारी होते. याची माहिती सीबीआयने वनविभागाला मागीतल्याची माहिती आहे. तुमसर वनविभागाचे नाकाडोंगरी, लेंडेझरी असे दोन स्वतंत्र वनपरिक्षेत्र सन २००७ मध्ये अस्तित्वात आले. भंडारा जिल्ह्यात दोन्ही वनपरिक्षेत्रात घनदाट जंगल असल्याची नोंद आहे. (तालुका प्रतिनिधी)