शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खड्यात रस्ते!

By admin | Updated: July 11, 2016 00:21 IST

एखाद्या गावाचा किंवा शहराचा विकास तेथील दळणवळण साधनांच्या सुविधांवर अवलंबून असतो.

वर्षभरात उघडली पोल : नागरिकांचा वाढला त्रास इंद्रपाल कटकवार / अशोक पारधी  भंडारा / पवनीएखाद्या गावाचा किंवा शहराचा विकास तेथील दळणवळण साधनांच्या सुविधांवर अवलंबून असतो. त्यात दर्जेदार विणलेले रस्त्यांचे जाळे त्या गावाची ओळखही सिद्ध करतात. परंतु भंडारा व पवनी शहरातील रस्ते दरवर्षी पावसाळ्यात धाय मोकळून रडतात. एका वर्षापूर्वी दर्जेदार बांधकाम झालेल्या रस्त्याचे पितळ पावसाळ्यात यंदाही उघडे पडले आहे.भंडारा शहरात तशीही मनोरंजनात्मक साधनांचा वाणवा आहे. फिरायला जाण्याच्या नावावर आबालवृद्धासांठी बोटांवर मोजण्याइतपत उद्यान आहेत. त्यातही या उद्यानात जाण्यासाठी ज्या रस्त्याचा वापर केला जातो, त्या रस्त्यानेही जीव तोंडात घातला आहे. वर्षभरापूर्वी साई मंदिर मार्ग ते मुस्लिम लायब्ररीकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. पावसाला सुरूवात झाली तसतसे रस्त्यानेही खरी रंगत कमी केली की काय? रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झाले. किमान दोन वर्ष तरी या रस्त्याचे डांबरीकरण निघणार नाही, असा सज्जड आत्मविश्वास बांधकामावर उपस्थित अभियंत्याने व्यक्त केला होता. वर्ष पूर्ण होण्याआधीच आत्मविश्वास तुटला आहे. रस्त्यावरील खड्यांमुळे आता नागरिकांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. दर्जेदार व गुणवत्तापूर्वक कामाची ही पावती आहे काय? असा सवाल नागरिक बोलून दाखवित आहेत. अशीच अवस्था पांडे महालासमोरील रस्त्याची आहे. याशिवाय जैन डेअरी गल्ली ते निर्वाण गल्ली, ग्रामसेवक कॉलनीतील जलशुद्धीकरण संयत्रासमोरील रस्ता, खांबतलाव चौक ते शास्त्री चौक, राजीव गांधी चाकात असलेल्या चव्हाण हॉस्पीटल ते खात रोडकडे जाणारा मार्ग, मुस्लिम लायब्ररी ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक आदी रस्त्यांचे हाल झाले आहेत. काही रस्ते नगर पालिका हद्दीत तर काही रस्ते राज्य बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतात. मात्र या रस्त्याच्या डागडुजीकडे वेळवर लक्ष दिले जात नाही. डागडुजी केली जात असली तरी मलिदा लाटण्यावर जास्त व गुणवत्तेवर कमी भर असतो. परिसणामी ज्वंलत स्थिती प्रत्येक वर्षी पावसाळ्यात डोळ्यासमोर उभी राहते.