शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

राखीव जंगल महामंडळाला सुपूर्द

By admin | Updated: July 5, 2014 00:16 IST

भंंडारा वन विभाागातील •भंंडारा, अड्याळ, पवनी, लाखांदूर, तुमसर, लेंडेझरी, जांब/कांद्री, नाकाडोंगरी...

भंडारा : भंंडारा वन विभाागातील •भंंडारा, अड्याळ, पवनी, लाखांदूर, तुमसर, लेंडेझरी, जांब/कांद्री, नाकाडोंगरी या वनक्षेत्रातील सुमारे २० हजार हेक्टर जंगल वन विकास महामंडळाला सुपुर्द करण्यात येणार आहे. या हस्तांतरणाला जंगलाशेजारी राहणाऱ्या गावकऱ्यांचा तीव्र विरोध होत आहे. या निर्णयामुळे येथील वन कामगारांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे.•भंडारा वन विभाागातील •भंंडारा वनक्षेत्रातील ७३१.१७३ हेक्टर, अड्याळ ७८७.९२३ हेक्टर, पवनी ३५८०.८६२ हेक्टर, लाखांदूर १७२६.०८ हेक्टर, तुमसर १६३४.१६० हेक्टर, लेंडेझरी ४२१७.४२२ हेक्टर, जांब/कांद्री ६३५२.३५७ हेक्टर, नाकाडोंगरी १५४७.६०३ हेक्टर असे २० हजार २१.०९१ हेक्टर राखीव जंगल वन विकास महामंडळाला सुपुर्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे या क्षेत्रातील वन संवर्धन व वनसंरक्षण करणारे वन कर्मचारी, वनपाल, वनरक्षक व वनमजुरांची पदे कमी होणार आहेत. वरिष्ठ पातळीवर फक्त वनपाल, वनरक्षक व स्थायी वनमजुरांनाच अन्य वनक्षेत्रात व इतर वन विभागात समाविष्ट करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु, मागील २० ते २५ वर्षांपासून रोजंदारीवर वन संवर्धन व वन संरक्षणाची कामे करीत असलेल्या वनकामगारांची कोणतीही तरतूद करण्यात न आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा वनमजुरांची संख्या सुमारे दीडशे ते २०० आहे.वन विभागाचे घनदाट व राखील जंगल वन विकास महामंडळाकडे सुपुर्द केल्याने वन विभागाकडे आता फक्त संरक्षित जंगल व झुडपी जंगल तेवढे उरले आहे. नैसर्गिक असलेले ०.४ घनतेचे दाट जंगलाची वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मेहनतीने संवर्धन व संरक्षण करून वाचविले आहे. आता वन विकास महामंडळाकडून या जंगलाची कटाई करून नवीन रोपवन लागवड करण्याची कामे होणार आहेत. त्यामुळे पर्यावरण व प्रदुषणाचा निकष डावलला जात असून वनकर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शिष्टमंडळात जे.एम.नंदूरकर, ईर्शाद सय्यद, संपतराव खोब्रागडे, राजू झंझाड आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)